किती उंच जाते तुझी झेप हल्ली ....

Submitted by जयदीप. on 27 June, 2014 - 01:54

घड्याळे स्वतःची पुढे ठेवशी तू
स्वतःला जगाच्या पुढे मानशी तू

तुझ्या आरशाला तडा जात आहे
कशाला स्वतःवर असे भाळशी तू?

जगाचा बदलतो नव्याने नकाशा
जगावर स्वतःला असे लादशी तू

किती उंच जाते तुझी झेप हल्ली ....
कुणाच्या जिवावर उड्या मारशी तू?

तुझ्या घोरण्याचा तुला त्रास नाही...
कुणाचे कधीही कुठे ऎकशी तू!

पुन्हा एकटासा इथे चंद्र होतो
अतोनात तारे इथे तोडशी तू!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users