भलतीच मर्यादीत ह्यांची झेप आहे

Submitted by बेफ़िकीर on 26 June, 2014 - 14:15

भलतीच मर्यादीत ह्यांची झेप आहे
उड्डाण घेण्याला म्हणे आक्षेप आहे

बाकी कुणाला दोष मी देऊ कशाला
मी मी स्वतः असणेच हस्तक्षेप आहे

जेथे हवे तेथे मला घेऊन जा तू
माझी तुझ्यापर्यंत केवळ ठेप आहे

सृष्टी इथे स्थापून जाणारा मिळेना
कोणास ही पडली नको ती खेप आहे

हा कोण आहे नेमका काही कळेना
नुसता युगांवरती युगांचा लेप आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कुणाला दोष मी देऊ कशाला
मी मी स्वतः असणेच हस्तक्षेप आहे
.
हा कोण आहे नेमका काही कळेना
नुसता युगांवरती युगांचा लेप आहे

बढिया शेर!

जेथे हवे तेथे मला घेऊन जा तू
माझी तुझ्यापर्यंत केवळ ठेप आहे....वा वा फार फार आवडला हा शेर सरळ,साधा तितकाच तरल.

सृष्टी इथे स्थापून जाणारा मिळेना
कोणास ही पडली नको ती खेप आहे .....क्या बात !

आवडली गझल.

धन्यवाद !

बाकी कुणाला दोष मी देऊ कशाला
मी मी स्वतः असणेच हस्तक्षेप आहे << व्वा ! >>
.
हा कोण आहे नेमका काही कळेना
नुसता युगांवरती युगांचा लेप आहे << क्या बात ! >>

सुंदर गझल