वा-यावरती भारे बांधत फिरतो आहे!

Submitted by profspd on 26 June, 2014 - 12:17

वा-यावरती भारे बांधत फिरतो आहे!
की, मी नुसता वा-यावरती सरतो आहे?

तुझ्या हवाली शीड, सुकाणू दोन्ही केले.....
म्हणून मी गलबताप्रमाणे तरतो आहे!

तूच पौर्णिमा, चंद्र तूच अन् तूच चांदणे.....
तुझ्याचसाठी चकोर माझा झुरतो आहे!

लिहिताना मी शब्दांमध्ये प्राण ओतले.....
तरी अर्थ शेराचा मागे उरतो आहे!

हिशोब आयुष्याचा लावू बघतो आहे.....
श्वास श्वास उसवून क्षणांना स्मरतो आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users