मला पाहते आणि ती फक्त हसते!

Submitted by profspd on 25 June, 2014 - 13:24

मला पाहते आणि ती फक्त हसते!
कळेना, मनीमानसी काय असते?

निमुट आपला चालतो मी कधीचा.....
कुठे नेमके नेत आहेत रस्ते?

अरण्यातुनी माणसांच्या निघालो.....
कुणी दंश करते, कुणी फक्त डसते!

कितीदा मनाला बजावून सुद्धा.....
बिचारे कसे मृगजळांनाच फसते?

किती जप, किती योग केला तरीही.....
स्मृतींच्या गराड्यात मन रोज फसते!

तुझे यायचे प्रहर गेले तरीही....
तुझी याद काढीत मन रोज बसते!

गराड्यांमधे फक्त नावास असतो.....
मला एकटेपण सतत खात असते!

कुठे स्वार्थही वेंधळ्याला समजतो?
असो फायदाही कधी लक्ष नसते!

सरळ लोचनी पाहुनी स्पष्ट बोला.....
असे बोलणे थेट हृदयात ठसते!

हवी साधना, रोज व्यासंग मोठा.....
अशांच्या उरी शारदा खुद्द वसते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीदा मनाला बजावून सुद्धा.....
बिचारे कसे मृगजळांनाच फसते?

किती जप, किती योग केला तरीही.....
स्मृतींच्या गराड्यात मन रोज फसते!

चांगले शेर.

<<< मला पाहते आणि ती फक्त हसते! >>>

मग पुढे काय करायला पाहिजे? ती काही करत नसेल तर तुम्ही पुढाकार घ्या. च्यायला ही काय ओळ आहे?

कसले बोडक्याचे प्राचार्य तुम्ही? काहीही लिहिता. समाजाशी काही बांधिलकी वगैरे? Wink

मग पुढे काय करायला पाहिजे? ती काही करत नसेल तर तुम्ही पुढाकार घ्या. च्यायला ही काय ओळ आहे?

कसले बोडक्याचे प्राचार्य तुम्ही? काहीही लिहिता. समाजाशी काही बांधिलकी वगैरे? >>> अरे हे काय आहे? प्राचार्याला सामान्य माणसारखाच मन असतो ना? करायची म्हणून टिंगल केली जातिये.
अशा वृत्तीचा मी निषेध करतो!!!

सन्मानणीय अ‍ॅडमिन,
काही लोक या प्राचार्य नावाच्या इसमाच्या लेखनावर बिनबुडाचे अपमानकारक आरोप करून त्याना या वयात मानसिक त्रास देत आहेत. अशा लोकांना आपण समज द्यावी ही नम्र विनंती. अशाने गझलेसारख्या उत्तम साहित्यप्रकाराची नाहक बदनामी आपल्या संकेतस्थळावर होत आहे. ती थांबवण्याचा आपण प्रयत्न करावा हीसुध्दा नम्रच विनंती.

- ह. बा. शिंदे

<<< एक कोते मन व कमालीचे कल्पनादारिद्र्य! >>>

सहमत.कारण एक कोते मन व कमालीचे कल्पनादारिद्र्य असलेला गझलकारच

मला पाहते आणि ती फक्त हसते!
कळेना, मनीमानसी काय असते?

असा भिक्कार शेर लिहू शकतो. Happy

<<<< भिका-याला दुसरे काय दिसणार? >>>

उत्तर सोप्प आहे.
आपल्यापेक्षाही जास्त भिक्कार असलेला भिकारी! Rofl