स्मशाने बरी, शांतता गात आहे!

Submitted by profspd on 25 June, 2014 - 10:44

स्मशाने बरी, शांतता गात आहे!
इथे गावच्या गाव कोमात आहे!!

झुळुक सारखी आज रेंगाळते का?
तुझा गंध या आसमंतात आहे!

ऋतू कोणताही असू द्यात चालू.....
फुलांची तिच्या नित्य बरसात आहे!

तिन्हीसांज होता मला भेटते ती....
असे वाटते की, पुनव रात आहे!

मला हारही भूषणास्पद असे ही....
मला खुद्द तू ही दिली मात आहे!

तुझी भाकरी और आहेच आई....
परब्रह्म प्रत्येक तुकड्यात आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझी भाकरी और आहेच आई....
परब्रह्म प्रत्येक तुकड्यात आहे!

>>> हा शेर आवडला ,

खरंतर सर , तुमचा लेखनात एक ना एक शेर तरी दर वेळी आवडतोच .... पण आपण इतका मारा करताय गझलांचा की हसुच येते ...

म्हणजे

घरी कुरवड्या करायला घेतल्या आहेत , मग शेवग्यात घाला गव्हाचा चीक अन पाडा कुरडई असे चित्र डोळ्यासमोर येते
...

बाकी काही राग लोभ नाही Happy