ओठात गझल वेड्या, फुकटात येत नाही!

Submitted by profspd on 25 June, 2014 - 06:15

ओठात गझल वेड्या, फुकटात येत नाही!
काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही!!

नुसतीच टूम म्हणुनी लिहितात कैक हौशी........
कसदार मात्र गझला लाखात फक्त काही!

साधे निमित्त पुरते, अन् मोडतोच पापड.......
तैनात भांडणाला, सरसावुनीच बाही!

भट ओळखून होते सारे छुपे पवित्रे.......
जयघोष आज त्यांचा चाले दिशांत दाही!

विसरून काय गेलो मी लावण्या कवाडे.......
जो तो घरात माझ्या डोकावुनीच पाही!

मी चालतो उन्हाचा, ते सावलीत होते.......
मज पाहताच त्यांची होते अशीच लाही!

हे वाळवंट आहे, हिरवळ कमीच आहे.......
ज्याची गरज मलाही, तितकीच ती तुलाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओठात गझल वेड्या, फुकटात येत नाही!
काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही!!>>>>>>>>>>>> आता जाळण्यासाठी काळीजच उरले नसेल ना.

मी चालतो उन्हाचा, ते सावलीत होते.......
मज पाहताच त्यांची होते अशीच लाही!
ओठात गझल वेड्या, फुकटात येत नाही!
काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही!!

अशी चारोळी छान झाली असती, समर्पक नि साधक

नुसतीच टूम म्हणुनी लिहितात कैक हौशी........
कसदार मात्र गझला लाखात फक्त काही!

>> हे तुम्हाला माहीत आहे हे वाचुन आनंद झाला ::हहगलो:

ओठात गझल वेड्या, फुकटात येत नाही!
काळीज जाळल्यावर मिळतात शब्द काही!! >>>>>>>>>>>> उणे १०० मार्क

नुसतीच टूम म्हणुनी लिहितात कैक हौशी........
कसदार मात्र गझला लाखात फक्त काही! >>>>>>>>>>>> उणे १०० मार्क

साधे निमित्त पुरते, अन् मोडतोच पापड.......
तैनात भांडणाला, सरसावुनीच बाही! >>>>>>>>>>>> + ३० मार्क

भट ओळखून होते सारे छुपे पवित्रे......
जयघोष आज त्यांचा चाले दिशांत दाही! >>>>>>>>>>>> उणे १०० मार्क

विसरून काय गेलो मी लावण्या कवाडे.......
जो तो घरात माझ्या डोकावुनीच पाही! >>>>>>>>>>>> + ५० मार्क

मी चालतो उन्हाचा, ते सावलीत होते.......
मज पाहताच त्यांची होते अशीच लाही! >>>>>>>>>>>> उणे १०० मार्क

हे वाळवंट आहे, हिरवळ कमीच आहे.......
ज्याची गरज मलाही, तितकीच ती तुलाही! >>>>>>>>>>>> + १०० मार्क

एकंदरित एकूण उणे २२० मार्क्स.

<<<< प्राध्यापकाची मोजपट्टी आपल्या गझलांना लावली तर तिनताड उडायची तयारी ठेवा म्हणजे झाल!
चुकून वरच्या इयत्तेचा पेपर घेतला की काय तपासायला? प्रश्नच समजलेले दिसत नाहीत महोदयांना! >>>

हे मला उद्देशून आहे, असे समजतो.

profspd,

१) तुम्ही स्वतःला प्राध्यापक/प्रोफेसर समजता, हा तुमचा समज आहे, माझा नाही.
प्राध्यापक तोच असतो ज्याच्या अंगात प्राध्यापकीचे गूण असतात.

२) नावासमोर प्रा/प्रो लावल्याने किंवा प्रा/प्रो च्या श्रेणीचा पगार उचलला किंवा मस्टरवर नाव आले म्हणजे प्राध्यापकीचे गूण सुद्धा आपोआपच नसानसात संचारायला लागतात, असेही नाही.

३) प्राध्यापक असणे म्हणजे सर्वगूणसंपन्नतेचे लक्षण नव्हे.

४) माझ्या माहितीप्रमाणे कविवर्य सुरेश भट/ संतशिरोमनी संत तुकाराम, ज्ञानदेव / गाडगेबाबा/ तुकडोजी महाराज/ म. गांधी/ पं. नेहरू यापैकी कोणीही प्राध्यापक /प्रोफेसर/प्राचार्य नव्हते.

५) ब्रम्हा/विष्णू/महेश/ अल्ला/ येशू यापैकी कोणीही प्राध्यापक /प्रोफेसर/प्राचार्य नव्हते.

६) भगतसिंग/ राजगुरू/ फडके यापैकी कोणीही प्राध्यापक /प्रोफेसर/प्राचार्य नव्हते.

७) कार्लमाक्स/ नेल्सन मंडेला माझ्या माहितीप्रमाणे यापैकी कोणीही प्राध्यापक /प्रोफेसर/प्राचार्य नव्हते.

८) मो.रफि, किशोरदा, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, पि टी उषा माझ्या माहितीप्रमाणे यापैकी कोणीही प्राध्यापक /प्रोफेसर/प्राचार्य नव्हते.

किमान भारतदेशाच्या इतिहासात तरी कोणतेच ऐतिहासिक घटनाचक्र प्रोफेसर या शब्दाच्या वलयाभोवती फिरताना दिसत नसताना

किंवा

प्राध्यापक असणे हे कोणत्याच पराक्रमाचे लक्षण नसताना तुम्ही वारंवार प्राध्यापक प्राध्यापक म्हणून आत्मप्रौढी मिरवता तो अत्यंत हिनकस दर्जाचा अहंकार असून प्राध्यापक या शब्दालाच काळिमा फासणारा आहे.

असो, तुमचा अहंकार तुम्हाला लखलाभ.

माज्या कविता/गझलांची तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे समिक्षा करण्यास मुक्त आहात. समिक्षा करण्याचा रसिकांचा अधिकार अबाधित आहे. खुशाल समिक्षा टिकाटिप्प्णी करा. Happy

मात्र, जमीनतस्करी, नक्कल किंवा पर्याय देण्यासारख्या मर्कटचेष्टा कराल तर खबरदार!

मिश्टर मुटे,
आपल्या गझला हातातही धरण्याच्या लायकीच्या नाहीत हे कोणीही नवशिक्या पण डोळे मिटून सांगेल!
कोल्ह्याला द्राक्षे आंबट! प्राध्यापकी पेशावर जे अकलेचे तारे तोडलेत त्यावरून आपला मानसिक स्तर समजला!
तुमच्या तथाकथित गझलांवर वेळ घालवायला मला काय वेड लागले आहे काय?
बाकीे बेदरकार व काल्पनिक बोलणा-या तुमच्या सारख्या इसमास काय कळणार म्हणा?

...............प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर

तळटीप:
युनिव्हरसिटि ग्रॅंट कमिशनने दिलेल्या हुद्दयाला कोणीही सोम्यागोम्याने प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही!
आपलीे पायरी व लायकी ओळखून वागा!
शालेय पेपर तपासा! माझ्या गझलांचे मूल्यांकन करायला तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील!

सतिशराव,

<<< आपल्या गझला हातातही धरण्याच्या लायकीच्या नाहीत हे कोणीही नवशिक्या पण डोळे मिटून सांगेल! >>>

माझ्या गझलेला "कोणीही नवशिक्या" काय म्हणेल ते मी आणि ते पाहून घेऊ. तुम्ही काय म्हणता ते सांगा.
भ्यायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही कलाकाराची कलाकृती निर्माण करेपर्यंतच त्याची असते. निर्माण होऊन लोकार्पण केली की ती लोकांची मालमत्ता होत असते. त्या कलाकृतीचे व्यक्तीसापेक्ष अर्थ लावण्याचे, टिकाटिप्पणी करण्याचे वा समिक्षा करण्याचे अधिकार अबाधित असते.

लोकांच्या टिकाटिप्पणीवरून कलाकाराने बोध घ्यायचा असतो. गरज भासली तर तिचे स्पष्टीकरण द्यायचे असते. त्यामुळे माझ्या गझलेला कोण काय म्हणतो, हे माझ्यातल्या रचनाकारासाठी महत्वाचे असते, असे मी मानतो.

तुम्ही तर माझ्या गझलेला "गझल" तरी म्हटले. काही लोक तर माझ्या गझलांना गझलच मानायचा तयार नाही. Happy

आपल्या कलाकृतीवरील चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया वाचतेवेळी ज्याची बुद्दी स्थिर व मन स्थितप्रज्ञ राहते, तोच खराखुरा कलाकार असतो.

* * * *

<<<< कोल्ह्याला द्राक्षे आंबट! >>>

म्हणजे काय बुवा. प्राध्यापकाची नोकरी मिळवणे म्हणजे शिवाजीने गड सर करणे एवढ्या तोलामोलाचे असते काय?
घमेंडच बाळगायचे आहे तर काही तारतम्य तरी बाळगायला हवे. प्राध्यापक असणे ही काही घमेंड बाळगण्यासारखी बाब आहे? या देशात पाच-पन्नास लाख प्राध्यापक आहेत. प्राध्यापक असणे म्हणजे काही एकमेवद्वितीय अशी बाब नक्कीच नाही.

पाचशे पेक्षा जास्त प्राध्यापक माझे मित्र आहे.पैकी एकालाही या तर्‍हेचे घमेंड नाही. माझा छोटा भाऊ सुद्धा प्राध्यापक आहे. तो प्राध्यापक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, मात्र त्याला नाही.

तळटीप : सध्या प्राध्यापकपदाची नोकरी मिळविण्यासाठी २० ते ४० लाख रुपये असा बाजारभाव चालू आहे. एवढी रक्कम मोजणारा सोम्या-गोम्यासुद्धा प्राध्यापक होऊ शकतो.

* * * *

<<< प्राध्यापकी पेशावर जे अकलेचे तारे तोडलेत त्यावरून आपला मानसिक स्तर समजला! >>>

जो काही असेल तो असेल, पण तो माझा स्तर आहे. तुम्ही चिंतातूर व्हावे असे काहीच नाही.

मात्र मी उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुद्देसुद व तर्कसंगत उत्तरे देण्यासाठी तुमचा मानसिक स्तर सक्षम नाही आहे, हे तर नक्की ना?
मी उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुद्देसुद व तर्कसंगत उत्तरे देण्याऐवजी आगपाखड करणे हे प्राध्यापकपणाचे लक्षण नाही.

* * * *

<<< तुमच्या तथाकथित गझलांवर वेळ घालवायला मला काय वेड लागले आहे काय? >>>>

ते मी काय सांगू? एखाद्या नजिकच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये गेला तर ते काही सांगू शकतील! तो त्यांचा अधिकार आहे. मी त्यांच्या अधिकारावर अतिक्रमन करणार नाही,

* * * *

<<<< बाकीे बेदरकार व काल्पनिक बोलणा-या तुमच्या सारख्या इसमास काय कळणार म्हणा? >>>>

हे खरे आहे पण मला काय कळायला पाहिजे तेच नाही कळले!

* * * *
<<<<< ...............प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर >>>>>
.
................. आचार्य गंगाधर महादेवराव मुटे

* * * *
<<<< तळटीप:: युनिव्हरसिटि ग्रॅंट कमिशनने दिलेल्या हुद्दयाला कोणीही सोम्यागोम्याने प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही! >>>

मी तुम्हाला प्रमाणपत्र देणारच कसा? मला तुमचेकडे प्राध्यापकाला साजेसा गूणच दिसत नाही आहे. मात्र युनिव्हरसिटि ग्रॅंट कमिशन देऊ शकते, त्यांना काय पैशाशी मतलब!

* * * *

<<< आपलीे पायरी व लायकी ओळखून वागा! >>>

मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने आणि मेंदू ऐवजी गुडघ्याने बोलणारा/लिहिणारा प्राध्यापक असूच शकत नाही. असलाच तर प्राध्यापकी पेशाला कलंकच आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

<<< शालेय पेपर तपासा! >>>

मी काय करावे, काय करू नये, हे विधिलिखित आधिच ठरले आहे. आता बदल नाही.

<<<< माझ्या गझलांचे मूल्यांकन करायला तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील! >>>>

पराकोटीची घमेंडी भाषा.स्वतःच्या रचनेला स्वतःच चांगले म्हणणारा इतका घमेंडी व आत्मप्रौढी मनुष्य कलाकारही असू शकत नाही.

तूर्त एवढेच.

तुमच्या दोघांच्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे. म्हातारे झालात तरी आजुन एकमेकाला आदर द्यायची अक्कल आली नाही बिनडोकांनो तुम्हाला? दोघेही उत्तम लिहीत असताना एकमेकांच्या अंगावर शेण फेकता आणि वर कुणाच्या शेणाचा वास जास्त घाण म्हणून भांडत बसता? लोकांना काय मजा मारत राहतात.

प्राचार्य,
आपल्या गझला उत्तमच असतात असे माझे वयक्तीक मत आहे. पण एवढे सुंदर लेखन. ग्रँट कमिशनने दिलेले प्राचार्यपद. तल्लख बुध्दी, परमेश्वर कृपेने अशी प्रतिभा लाभली असताना स्वतःची अशी अवस्था करून घेता? वेडे कुठले!!!

मुटे सर,
नागपुरी तडक्याची किंमत लोकांना कळाली पण तुम्ही लाखाचं लिहून दमडीची वृत्ती बाळगता आहात. आपल्या लिखाणाचा बाज वेगळा आहे. त्याला माणसाच्या नित्याच्या जगण्याचा ओलावा सदैव चिकटून असतो. थोड्याश्या गांभिर्याची जोड त्याला मिळाली तर महाराष्ट्राला एक मातिचं लिहीणारा सोन्यासारखा लेखक मिळेल. पण तुम्ही च्यामारे भंगार पत्र्यासारखे तडातड वाजत राहताय? वेडे कुठले!!!

सारांश,
आपला आदर करणार्‍या माझ्यासारख्या काही वाचकांसाठी ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. राग नसावा. लोभ असावा. आपला नम्र. - हबा

अवांतर :
आजकाल माबोवर गझलेला विटंबनेला सामोरे जावे लागत आहे. मी ही परिस्थीती सुधारत नाही तोवर माबोवर ६४ चकल्या पाडायच्या नाहीत आणि धन्यवादची बुंदीही घालायची नाही असे ठरवले आहे.
काही दर्जेदार लेखन वाचावयास मिळेल. चार दोन मित्र भेटतील. यावे, वाचावे, जमेल ते छान बोलावे आणि हालावे. असा चारकलमी कार्यक्रम राबवत आहे.

धन्यवाद ह.बा.!
वर मुटे इसमास जे लिहिले तो माझा पिंड नाही! नाइलाजाने व स्वत:ला क्लेशकारक असूनही लिहावे लागले! असो!
एक शेर देखिल पुरेसा आहे मी काय जगलो/जगतो आहे ते व्यक्त करायला......

गरज माझी पायथ्याला जास्त होती......
शिखरही नाकारले मी दिलखुशीने!

प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर

<<< वर मुटे इसमास जे लिहिले तो माझा पिंड नाही! नाइलाजाने व स्वत:ला क्लेशकारक असूनही लिहावे लागले! >>>

कसला नाईलाज?

मी फक्त माझ्यापरिने गझलेवर प्रतिसाद नोंदवला. आवडले ते आवडले म्हणालो. नावडले ते नावडले म्हणालो. यात गैर काय आहे.? नावडल्यानंतरही आवडले म्हणायला मी काय भाट आहे?

त्यावर तुम्ही मला माझ्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले!

त्यावर मी माझी बाजू अगदी सभ्य भाषेत मांडली तर तुम्ही मुद्देसुद उत्तर देण्याऐवजी माझा मानसिक स्तर स्तर काढला.

वरून नाईलाज म्हणताय? स्वतःला वारंवार प्राध्यापक/प्रोफेसर/प्राचार्य समजता तर त्यातोडीचे आचरण करून प्राध्यापक/प्रोफेसर/प्राचार्य या पदांचा सन्मान वाढवा.

तुमची तर्‍हा अशी असेल मी नाहीतर आणखी कुणी, रोखठोक बोलेलच.

>>युनिव्हरसिटि ग्रॅंट कमिशनने दिलेल्या हुद्दयाला कोणीही सोम्यागोम्याने प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही!>>

या वाक्याची फेक पाहून पु.ल.देशपांडे यांच्या म्हैस कथेत "कॉफिन, कॉफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटीका" असं आवेशात बोलणार्‍या मास्तरांची आठवण झाली.

- - - - - - - - - -- - - - -- - - - -- - - - -- - - - -- - - - -- - - - -

बाकी ह.बा.साहेब यांचा प्रतिसाद वाचून डोळ्यांत पाणी आले. किती मृदू हृदयाचे असावे एखाद्याने!

Pages