गुंता

Submitted by समीर चव्हाण on 25 June, 2014 - 01:07

एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते

साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते

काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते

तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते

आता डोळेझाक जाणिवेपोटी करतो
मेलेल्यांचीसुध्दा कोणी चिंता करते

‘समीर’ असून जिथे-तिथे, नव्हता कोठेही
काय नवल जग रितेपणाची हव्वा करते

समीर चव्हाण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते

साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते

काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते

तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते

‘समीर’ असून जिथे-तिथे, नव्हता कोठेही
काय नवल जग रितेपणाची हव्वा करते

मतला फार सुंदर, वरचे शेरही आवडले.

'हव्वा' ह्या शब्दाचा वापर फार आवडला. हवा ने तो परीणाम साधला गेला नसता असे वाटले.

एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते.......क्या बात ! क्या बात !!

साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते..... अगदी अगदी !

काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते......वा !

यावरून माझा एक शेर आठवला इथे नमूद करायची गुस्ताखी करतेय क्षमस्व !

आयुष्याने केले आहे निरिच्छ इतके
कशी पूर्तता करू तुझ्या माफक इच्छांची

गझल सुरेखच!

धन्यवाद !

-सुप्रिया.

>>
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते

तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते
<<

वा!