जन्मभर मी थांबलो त्याच्यासवे बोलायला....

Submitted by profspd on 24 June, 2014 - 09:10

जन्मभर मी थांबलो त्याच्यासवे बोलायला....
मी निघालो आणि आले नभ मला भेटायला!

घेउनी गळफास बळिराजा अखेरी संपला....
लागले आभाळ आताशा कुठे दाटायला!

जोडण्या नाते जिवाचे जन्म सारा लागतो....
पळभराचा वेळ पुरतो मात्र ते तोडायला!

भांडल्याने माणसे तुटतात कायमची अरे.....
पाहिजे काळीज प्रेमळ माणसे जोडायला!

जिंदगी होते सुरीली, धुंद जगण्याची हवी....
लागतो कोठे गळा धुंदीत गाणे गायला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेउनी गळफास बळिराजा अखेरी संपला....
लागले आभाळ आताशा कुठे दाटायला!

बळीराज्याच्या गळफासाला आभाळ अजिबात जबाबदार नाही आहे. उगीच आभाळाला दुषणे देऊ नका.

जिंदगी होते सुरीली, धुंद जगण्याची हवी....
लागतो कोठे गळा धुंदीत गाणे गायला?

चांगला शेर. Happy

शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.

शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना
जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो.
चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच.

शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची हिंमत नाहीये कारण
पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती

तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे.
"मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!