या दिलाशांत आहेत दडले सुरे!

Submitted by profspd on 23 June, 2014 - 15:29

या दिलाशांत आहेत दडले सुरे!
हद्द झाली अरे, दु:ख आता पुरे!!

डाग त्यांनी पहा दडवले कालचे.....
अन् फिरू लागले लावुनी ते तुरे!

फक्त ओवाळती एकमेकांस ते....
फार झाले अता हार अन् हे तुरे!

या जगाची जणू वाहती ते धुरा....
पाहिले सर्व मी हे धुरंधर धुरे!

भुंकुनी भुंकनी पार बसला घसा....
बघ, अता फक्त लांबून तो गुरगुरे!

ते समजतात गझलांस चकल्या अता....
वाटती शेर त्यांचे मला तर चुरे!

एकही शेर दमदार ना सापडे....
शेर त्यांचे जणू वाटती कुरकुरे!

काळ घेतो परीक्षा बरोबर अरे....
कोण त्यांच्यातला पाहतो मी उरे!

स्वप्न होते भटांचे किती चांगले.....
पाहुनी दृश्य इथले हृदय हे झुरे!

कैक शायर शिकू पाहती शायरी....
त्यांचियास्तव अरे, जीव हा हुरहुरे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users