पाहिले मी, ते खरे होते!

Submitted by profspd on 21 June, 2014 - 09:14

पाहिले मी, ते खरे होते!
चेह-यावर चेहरे होते!!

पाच रुपयांना मिळे क्वार्टर....
दिवस पूर्वीचे बरे होते!

मी न टकल्या, हे नसे थोडे....
केस थोडे पांढरे होते!

ना मला अदमास पाण्याचा....
केवढे रे, भोवरे होते!

लागलो नादी न कोणाच्या....
लोक सारे चावरे होते!

का झरायाच्या न या गझला?
अंतरी माझ्या झरे होते!

लावली ना तोरणे दारी....
मी सजवले कोपरे होते!

त्यांस सोयर ना कधी सूतक....
नाममात्रच सोयरे होते!

घमघमाया लागल्या गझला....
आत त्यांच्या मोगरे होते!

हुडहुडी का त्यांस भरलेली?
शब्द त्यांचे कापरे होते!

वळचणीला राहिली दु:खे....
जवळ माझ्या आसरे होते!

बुद्धिवंतांच्यात मज दिसले....
कैकजण तर डावरे होते!

पाहिले आकाश जवळोनी....
त्यात सुद्धा पिंजरे होते!

घोर होता मायबापांना....
मूल भलते वाबरे होते!

वाचुनी प्रतिसाद मज वाटे....
लोक सारे ओकरे होते!

वाटलो श्रीमंत, दुनियेला.....
गाल माझे गोबरे होते!

वाटलो मी कोण रे, त्यांना?
चेह-यावर ‘बाप रे’ होते!

सडकुनी करतात ते निंदा....
त्यांचियापाशी छरे होते!

राहिलो आजन्म उघड्यावर.....
हालणारे चौथरे होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाच रुपयांना मिळे क्वार्टर....
दिवस पूर्वीचे बरे होते!

>>> कुठली क्वार्टर पाच रुपयांना मिळायची ? देशी ?

गुड क्वेश्चन!!!!!!!!!!!!!
रम/डि्एसपी....इत्यादी ५रुपयांना मिळायची क्वार्टर १९७७-७८साली!