सोसण्याची जाहली माझी तयारी!

Submitted by profspd on 21 June, 2014 - 05:15

सोसण्याची जाहली माझी तयारी!
कोणतेही जहर दे आता विषारी!!

लोक धिंगाणा किती करतात गझले.....
माणसे आहेत ही तर संपणारी!

रामप्रहरी तू कसा येतोस दु:खा?
ऐक माझे, फुरसतीने ये दुपारी!

जिंदगी आता कुठे रंगात आली....
तोच का येऊन ठेपे मरण दारी?

पांडुरंगा, यायचे ना ते कधीही.....
श्वास घेण्यालाच ते म्हणतात वारी!

बिनसुपारीचीच पाने सेवती ते.....
दात नाही राहिले, कुठली सुपारी?

मारती डबक्यात डुबक्या फक्त आता....
तेच त्यांना वाटते घेणे भरारी!

कल्पनादारिद्र्य कोठे झाकते का?
झूल गझलेला कितीही घाल भारी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोसण्याची जाहली माझी तयारी!
कोणतेही जहर दे आता विषारी .... खूप आवडला. +५० मार्क

लोक धिंगाणा किती करतात गझले.....
माणसे आहेत ही तर संपणारी! .... नावडला. उणे १०० मार्क

रामप्रहरी तू कसा येतोस दु:खा?
ऐक माझे, फुरसतीने ये दुपारी! .... आवडला. +२० मार्क

मारती डबक्यात डुबक्या फक्त आता....
तेच त्यांना वाटते घेणे भरारी! .... नावडला. उणे १० मार्क

कल्पनादारिद्र्य कोठे झाकते का?
झूल गझलेला कितीही घाल भारी! .... उणे २० मार्क

एकंदरित उणे ६० मार्क्स.

कसले दणकुन गझलीय जुलाब होतायेत हो तुम्हाला
इयत्ता दुसरीपासुन केलेल्या, इतक्या वर्षांच्या गझला मा बो करांच्या माथी मारणार असे दिसतेय

:-D. befi