देव समजू लागले दैत्यास ते!

Submitted by profspd on 21 June, 2014 - 02:52

देव समजू लागले दैत्यास ते!
फासती शेंदूर का दगडास ते?

लीलया ते विस्तवाशी खेळती....
घाबरत नाही म्हणे मरणास ते!

रक्त पाण्यासारखे ते सांडती....
जाहले मोताद बघ, पाण्यास ते!

काय डोईफोड त्यांची चालली....
मारती लाथा किती, वा-यास ते!

उघडले डोळे न ठेचाळूनही....
आजही म्हणती ‘खरे’ भासास ते!

केवढी गेली मजल त्यांची पहा....
काजवा म्हणतात बघ, सूर्यास ते!

जिंदगीने शाहणे केले किती....
फूल मानू लागले काट्यास ते!

धापले वार्धक्य माझे केवढे.....
दे मला तुझिया मिठीचे श्वास ते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users