भेगाळल्या मनाला अद्याप सांधतो मी!

Submitted by profspd on 20 June, 2014 - 00:11

भेगाळल्या मनाला अद्याप सांधतो मी!
भूकंप संपला पण, अजुनी दुभंगतो मी!!

भिंती पडीक, तुटक्या खिडक्या, वरी न छप्पर...
आयुष्य सरत आले, घर एक बांधतो मी!

माझ्यामधेच माझा शत्रू दडून बसला....
त्याच्यासवेच हल्ली दिनरात झुंजतो मी!

आखून एक घेतो सीमा स्वत:चसाठी.....
चुकवून नजर माझी, ही हद्द लंघतो मी!

दुनियेस वाटते मी गझला लिहीत असतो....
प्रत्यक्ष मात्र माझे काळीज विंधतो मी!

तू फक्त एक प्याला मज पाजला दिठीचा....
झाली कितीक वर्षे, अद्याप झिंगतो मी!

खिडकीतुनी पहातो तुकडा तुझ्या नभाचा....
माझी तमाम दु:खे त्यालाच सांगतो मी!

माझा असा स्वत:चा कुठलाच रंग नाही....
बेरंग या जगाच्या रंगात रंगतो मी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा असा स्वत:चा कुठलाच रंग नाही....<<< वा वा

खिडकीतुनी पहातो तुकडा तुझ्या नभाचा....
माझी तमाम दु:खे त्यालाच सांगतो मी!<<< वा वा

झाली कितीक वर्षे, अद्याप झिंगतो मी!<<< वा