प्रेम होताना मला..... मी गायलो

Submitted by जयदीप. on 19 June, 2014 - 22:45

झोप तू माझी अशी उडवून जा
स्वप्न तू माझे....खरे होऊन जा

रोज मी घेईन त्याची काळजी
शब्द तू माझ्याकडे ठेऊन जा

प्रेम होताना मला..... मी गायलो
तेच गाणे एकदा गाऊन जा

भेट ओहोटीप्रमाणे एकदा
परत जाताना मला घेऊन जा

झेप मी घेईन या शरिरातुनी
पंख तू आता तुझे देऊन जा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेट ओहोटीप्रमाणे एकदा
परत जाताना मला घेऊन जा

व्वा !!

स्वप्न हो माझे असे केले तर :)...सहजच सुचले म्हणून सहजच सांगीतले न आवडल्यास मनावर घेवू नये