हृदय माझे जळत होते!

Submitted by profspd on 19 June, 2014 - 15:02

हृदय माझे जळत होते!
फक्त मजला कळत होते!!

कवडसे पकडायला हे....
पाय माझे पळत होते!

मी सरळमार्गी परंतू....
मार्ग माझे वळत होते!

आसवे ढाळीत नव्हतो....
रक्त माझे गळत होते!

झुळुकही आली तुझी ना....
प्रहर नुसते टळत होते!

ते गुलाबी दु:ख होते...
चांदणे मज छळत होते!

विस्मृतींनी ग्रासलो मी...
सारखे मन चळत होते!

भरडलो अन् बदललोही....
हे जिणे मज दळत होते!

लालिमा आला नभाला....
प्राण माझे ढळत होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६

Group content visibility: 
Public - accessible to all site users