नोकरी मिळते मनासारखी

Submitted by जयदीप. on 19 June, 2014 - 10:46

वाटते ती पाहिल्यासारखी
वेदना दिसते तुझ्यासारखी

पाहिले होतेस स्वप्नामधे
नोकरी मिळते मनासारखी

पाहुणा आहे मला मी इथे
ती मला आहे घरासारखी

जीवना हे शिकवले तू मला
सावली सुद्धा उन्हासारखी

सांग तू ऎकून आतातरी
मी शिवी देतो कुणासारखी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users