कोकण

Submitted by अवल on 27 December, 2008 - 04:00

आदित्याच्या तिलक भालीचा,
बघ पसरे धरतीच्या गाली.
विरली धुंद धुक्याची स्वप्ने,
अन सह्याद्रीच्या धूसर लाटा |

दिसू लागली हिरवी शेते,
कडे कपारी काळ्या पिवळ्या.
वर पहुडले ऊन कवडसे.
जणू वर्ख कांचनी पाचूभवती !

गुलमोहर: