संपून दिवस जातो, निसटून रात्र जाते

Submitted by जयदीप. on 17 June, 2014 - 21:27

येऊनही घराशी फिरतात परत वारे
हल्ली तुझ्या घराची असतात बंद दारे

संपून दिवस जातो, निसटून रात्र जाते
मी शोधतोच आहे शब्दांमधे सहारे

आपापलीच हलती आशाळभूत पाने
आता हवेप्रमाणे गेलेत दूर वारे

येतो, निघून जातो... वणवा उडाणटप्पू
पेटून आठवांचे छळतात मग निखारे

मी आवरून घेतो कित्येकदा स्वतःला
येतेस तू पुन्हा अन् होतात हे पसारे

पोहून घे जरासे, वाहून घे जरासे
जयदीप 'जीवना'चे गाठू नको किनारे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान