मरण आले, ये म्हणालो!

Submitted by profspd on 17 June, 2014 - 13:41

मरण आले, ये म्हणालो!
बैस थोडेसे म्हणालो!!

जिंदगी गुंडाळतो मी....
मग भले मज ने म्हणालो!

संकटे होतात संधी....
संकटे मज दे म्हणालो!

खेळणे होतेच तेही....
हृदय माझे घे म्हणालो!

जायचे आहेच नंतर....
टेक रे थोडे म्हणालो!

जीभ रेटेनाच माझी....
‘होय’ दु:खाने म्हणालो!

एक पाचोळा जणू मी....
उडव, गगनी ने म्हणालो!

वाटमा-यांना कसे मी,
चक्क वाटाडे म्हणालो?

बोलताना भान नव्हते....
‘बैल’ थट्टेने म्हणालो!

ऐकुनी टापाच त्यांच्या....
‘कागदी घोडे’ म्हणालो!

वेद उच्चारण बघोनी....
त्यांस मी रेडे म्हणालो!

काय माझी चूक झाली?
त्यांस सोंगाडे म्हणालो!

काफियांची चवड नुसती....
‘गझलसांगाडे’ म्हणालो!

केवढे संतापले ते....
काय कांगावे म्हणालो!

लागले काढू फणा ते....
फक्त मी ‘का रे’ म्हणालो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकसुरी वाटली गझल
असो
बैल घोडे रेडे .. जनावराचा बाजार भरायचा पूर्वी वारीत आमच्याकडे तो आठवला .
सुरुवातीचे काही शेर काहीसे चांगले वाटले आहेतच व ते आवडलेही आहेतच कृ.गै . न.