ऊन्ह थकलेले पहाते लाभते का सावली....

Submitted by profspd on 14 June, 2014 - 09:23

ऊन्ह थकलेले पहाते लाभते का सावली....
सावली प्रेमळ अशी, तात्काळ तिकडे धावली!

का मला माझेच जगणे वाटते दुर्बोध हे?
मी कितीदा जिंदगी माझी मला समजावली!

माझिया श्रद्धांजलीची भाषणे मी ऐकली.....
सोयरे सोडून बाकी माणसे हेलावली!

कैक उघडी नागडी पडलीच दु:खे शेवटी.....
काळजाच्या पोतडीमध्ये न सारी मावली!

त्यामुळे मी राख झालो, शमवले नाही कुणी....
जाहली चर्चा परंतू आग कोणी लावली?

तू तुझ्या कैफामधे उधळीत गझला बैसतो....
सुळसुळाटाने तुझ्या ही माणसे बघ कावली!

कोण मी? कोठून आलो? अन् कुठे मी चाललो?
प्रश्न हे ऐकून माझे जिंदगी भांबावली!

काल अंगाई म्हणाया मी विसरलो नेमका......
तू दिलेली वेदना मग केवढी रागावली!

यापुढे आहे खरी माझी कहाणी, लोकहो.....
लोचने आताच तुमची का बरे पाणावली?

भळभळाया लागल्या जखमा कशा गझलेत या?
आज का प्रत्येक द्विपदी एवढी ओलावली?

मी जसा आहे तसा स्वीकारले आहे मला.....
आरशाला मात्र प्रतिमा एवढी ना भावली!

जेवणाचा ना अरे, पत्ता, भुकेचा डोंब हा......
कोण करतो का रित्या पोटी कधी शतपावली?

क्षेम तू पुसतेस माझे, हे न थोडे थोडके......
फार दिवसांपासुनी तब्येत ही खालावली!

त्यामुळे डोळ्यात माझ्या राहिले पाणी उभे.....
वेदना मध्येच मजला कडकडोनी चावली!

सोय-यांच्या रंगल्या गप्पा स्मशानी एवढ्या.....
की, चिता नाहीच, शेकोटी जणू शिलगावली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असूदे अनेक काफिये उधारीचे असले तरी शेर बरे वाटत आहेत
अनेक शेर मला तरी आवडले
(पण काही काफियांसोबत खयालही जसेच्या तसे उचललेले दिसत आहेत ह्यावरून हा "पर्यायी"च्या प्रयत्नाचा एक भाग तर नाहीना असेही वाटले Happy
असो

तुमच्या गझलेवरून कुणीतरी गझल पाडली आहे असे वाटते आहे. पण इथले संदर्भ अधिक व्यापक वाटताहेत. असो पण काही शेर उत्तम आहेत.

त्यामुळे डोळ्यात माझ्या राहिले पाणी उभे.....
वेदना मध्येच मजला कडकडोनी चावली!

तुम्हाला वेदना चावली तर आपल्याला काहितरी वेगळे चावायला हवे असे वाटून एका कविने डायरेक्ट गांधिलमाशी चावून घेतली आहे.

काल अंगाई म्हणाया मी विसरलो नेमका......
तू दिलेली वेदना मग केवढी रागावली!

सुरेख शेर आहे हा. यावरून गिरवलेला शेरही तितकाच दर्जेदार आहे.