गझल हाय, गातात जैसे तराणे!

Submitted by profspd on 11 June, 2014 - 01:06

गझल हाय, गातात जैसे तराणे!
कुठे पाहिली काळजाची उधाणे?

असे शेर लिहितो जसे की, सुभाषित....
जणू घालतो मी जगाला उखाणे!

मला पाठ झालीत सारी निमित्ते....
अता शोध दुसरे नवे तू बहाणे!

रुबाया, गझल, गीत भांडार माझे....
उधळतो जगावर कुबेराप्रमाणे!

विषारी कसे पीक शेतात आले?
किती शुद्ध रे, पेरले मी बियाणे!

गझल श्वास ज्यांचा, गझल ध्यास ज्यांचा....
किती सांग उरलेत ऐसे दिवाणे?

सुरावट तुझी घेउनी जन्मलो मी....
उभा जन्म ओठांवरी तेच गाणे!

अरे, घाम गाळून वैभव कमवले....
मिळाले मला वारशाचे न आणे!

निनादेल माझी गझल दशदिशांना.....
अरे, हरगझल एक कलदार नाणे!

तुझे घाव हृदयात जोपासतो मी....
मला प्यार माझे जुनेरे पुराणे!

तिरस्कार गझले तुझ्याही नशीबी....
मिरवतेस का तू भटांचे घराणे?

पहा लावती झुंज ते कोंबड्यांची....
कसे टाकती कोंबडीलाच दाणे!

चरकतेच काळीज पाहून ऐसे....
दिवेलागणीला दिवे चक्क जाणे!

अताच्या पिढीला न ठाऊक आदब....
असे बोलती...चक्क उडती फुटाणे!

शिकारी अखेरीस हैराण झाले....
मला पाहतानाच चुकती निशाणे!

मना, ऐक माझे, नको पाय ठेऊ....
इथे चालते दात अन् ओठ खाणे!

अरे, एक तो झोत वा-याप्रमाणे....
कसे शक्य तो एकजागी रहाणे?

कटाक्षात एकाच ती ठार करते.....
किती जीवघेणे असे ते पहाणे!

तिला चिंब ओलेच पाऊस करतो....
निहाळीत बसतो तिचे धुंद न्हाणे!

अता फक्त एकांत पाहून येती.....
अखेरीस झालेच अश्रू शहाणे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

६६

एक लिंबु झेलु बाई ....एक लिंबु झेलु
दोन लिंबु झेलु बाई .... दोन लिंबु झेलु
तीन लिंबु झेलु बाई ....तीन लिंबु झेलु
चार लिंबु झेलु बाई ....चार लिंबु झेलु
पाच लिंबु झेलु बाई .... पाच लिंबु झेलु :खिखि:

अता फक्त एकांत पाहून येती.....
अखेरीस झालेच अश्रू शहाणे! >>>>>>>> हा आवडला.

पहा लावती झुंज ते कोंबड्यांची....
कसे टाकती कोंबडीलाच दाणे! >>>>>>>> कसे टाकती कोंबड्यांनाच दाणे! मी असा वाचला तर अर्थ लागला, मात्र च भ्ररिचा राहतोच.

चूरमुर्याच्या पोत्यातुन चुरमुरे सांडावेत तश्या गझला सांडत आहेत, वा!!याला म्हणायचं कवीची 'प्रो.'तिभा!