छान मी गातो म्हणाले ते मला

Submitted by जयदीप. on 9 June, 2014 - 15:30

तो नशीबानेच त्याच्या सांडला...
जीव मी प्रत्येक वेळी ओतला!

जायचे होते मलाही दूर ...पण
नेमका अर्ध्यात रस्ता हरवला!

घर नव्याने घेतल्यावर वाटले
की जुना शेजार होता चांगला...

छान मी गातो म्हणाले ते मला
मी तुझा आवाज होता काढला !

तो मला सोडून गेला शेवटी
जो पुढे जाऊन होता थांबला....

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users