बघ जमतय का

Submitted by anjali maideo on 6 June, 2014 - 13:19

बघ जमतंय का ?

बघ जमतंय का खोटं खोटं वागणं
नावडतं कामही आवडीनं करणं

बघ जमतंय का कारण नसता रेंगाळणं
घड्याळाकडे बघुनही वेळ आहे म्हणणं

बघ जमतंय का पसा-यात बसणं
पसा-यात हरवलेले जुने क्षण शोधणं

बघ जमतंय का कारण नसताना बोलणं
विनाकारण बोलता बोलता सुखसंवाद साधणं

बघ जमतंय का चौकट मोडून जगणं
शिस्तिच्या तुझ्या मनाला मुक्त मोकळं सोडणं

बघ जमतंय का मिनीटांचा हिशेब न ठेवण
सरणा-या वेळाला त्याच्या लयीत सरु देणं

अंजली मायदेव
६/६/२०१४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्ध न मजला कळला कधी
तो माझ्या दिशेने न वळला कधी.....
माझी व्यथा अगदीच साधी
पण कुणा सांगायचे न जमले कधी.....