कर बंद ही सराफी, नाही उठाव येथे!

Submitted by profspd on 6 June, 2014 - 02:21

कर बंद ही सराफी, नाही उठाव येथे!
सोन्यास शून्य किंमत, मातीस भाव येथे!!

वेषात सावकारी दडलेत भामटे हे....
नुसतीच झूल आहे, कोणी न साव येथे!

दूरान्वये न ज्यांचा संबंध शायरीशी.....
त्यांचे त-हेत-हेचे बघतो स्वभाव येथे!

तालीमबाज झाली ही काय ‘मायबोली’?
एकेक मल्ल करतो त्याचा सराव येथे!

ह्यांना कसे कळावे चैतन्य निर्झराचे?
हा कूपमंडुकांचा निव्वळ जमाव येथे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

हा कूपमंडुकांचा निव्वळ जमाव येथे!<<<<<<<

हे असे आहे तर इथे झक मारायला तुमच्यासारख्या गझलगांडुळांनी यावेच कशाला !!!!!

हे असले विचारच तुम्हाला एक नालायक गझलकार ठरवू पाहत आहेत पण आता दुरुस्ती करण्यातही काही हासिल नाही तुमचं जे व्ह्यायचं होतं होवू शकणार होतं गझलेत ते झालय कृपया आता गझल निवृत्ती घेवून घरी शांत बसावे

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गाडुळांचा भोंदू जमाव नाही

मराठी गझलेच्या बापाला ह्या शेरासाठी लाखो सलाम !!!!

आपल्या बुडाशी असलेला अंधार पहा आधी! फुकटचे अशोभनीय व अनाहूत सल्ले कुणाला द्यायला जाऊ नकोस!

काहीही बोलले तरी चालते असा भाबडा समज झालेला दिसतोय! मी जे जगतो/अनुभवतो ते लिहितो, काल्पनिक लिहित नाही!

मी जे जगतो/अनुभवतो ते लिहितो, <<<<<<

मग निसंकोचपणे सांगेन की अत्यंत निकृष्ट आणि फुकटही घेवू नयेत असे आहेत तुमचे हे जीवनानुभव

चुलीत जाळा ते गझलेत नको !!

किड्या मुंग्यांना सगळी गांढूळेच दिसायची! त्यांच्या नजरेचा टप्पा तो केवढा असणार?<<

तोंड आवरावे माहाराज ! आपण चक्क भटांना किडामुंगी म्हणत आहात !!

स्वत:ची गझलकार काय साधी कवी म्हणून काय योग्यता आहे हे तपासून पहा! दुस-याचे परिक्षण करायची पोच तर दूरकी बात है! फारच मागासवादी विचार!

शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो!

तुम्ही शिक्शक कधी झालात तुमची शिकावूपणाची टर्मच अजून संपलेली नाहीये !!!!!

स्वत:ची गझलकार काय साधी कवी म्हणून काय योग्यता आहे हे तपासून पहा!
<<<< त्या शिवाय का तुमच्या सारख्या "पर्यायीगझल" सम्राटाने माझ्यासारख्या गझलभणंगाकडून तब्बल तीन इस्लाह भीक मागून घेतलेत आणि स्वतःच्या शेरात त्यानुसार बदल केलेत आजवर ??? आठवा .......

तुला गझल/गझलियत याचे अवाक्षर तरी माहित आहे का रे<<<<<

तर तर ! त्याशिवाय का तुमच्यापेक्षा चांग्ले शेर करू शकलोय मी ???

मच्छरांच्या नादी लागणार नाही असे मी ठरवले होते! पण तुझ्या उर्मट बोलण्यामुळे मला असे बोलावे लागत आहे याचा मला विषाद वाटत आहे!
इथून पुढे तुझ्या कोणत्याही बरळण्याची दखल घेणार नाही! याचा अर्थ तू काहीही लिहावे असा समज करून घेऊ नकोस! माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात!

माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात<<<<<

तेच तर माबोकर तुम्हाला ओरडून ओरडून सांगतायत पण तुमच्यातला गझलकार नर्मदेच्या गोट्यासारखा गुळगुळीत झाला आहे ह्या पाषाणापुढे कितीही खडे फोडून काही करून उपयोग नाही !!!

कमलेश पाटील ह्या जुन्या मबो गझलकाराने काल एक धागा काढला त्याला काही काफिये हवे होते इतक्या छोट्या अणि सर्रास घडणार्‍या बाबी वरून लोक काय घालून पाडून बोलले बिचार्‍याला गझलकार ह्या शब्दाला तुम्ही जी किंमत आणली आहेत ती जरा पहाच तिथे जावून http://www.maayboli.com/node/49248
कुठे फेडाल हे पाप ?????

तुझ्या उर्मट बोलण्यामुळे मला असे बोलावे लागत आहे याचा मला विषाद वाटत आहे!<<<<<

माबोवरून मिळणार्‍या अणखी एका संभाव्य डच्चूला घाबरलात की काय इतक्यात ?

आणि हो तिथेही कृपया आमच्या मामींचे डो़के खावू नये त्यांची आयुष्याची शेवटची वर्षेतरी सुखाने जावोत ही ईश्वरचरणी प्रार्थना
>>> वैवकु, भान ठेवा Happy

भान ठेवा <<<<

तुम्ही सांगताय म्हणून ऐकतो आहे यात्रीजी ते वाक्य पुसले आहे
त्या वाक्यासाठी देवपूरकर मामींची इथूनच क्षमा मागतो !

माझं म्हणणं तेवढ्याच वाक्यापुरतं होतं <<< Lol

अरेरे, येथे चक्क भांडणे झाली.

तालीमबाज झाली ही काय ‘मायबोली’?
एकेक मल्ल करतो त्याचा सराव येथे!<<<

प्राचार्य, हा काय शेर आहे का? काही अर्थ आहे का ह्या शेराला? उगाच मायबोलीला नावे ठेवू नका. आणि हेही म्हणू नका की मायबोली म्हणजे तुम्हाला मराठी भाषा अभिप्रेत होते.

"ह्यांना कसे कळावे चैतन्य निर्झराचे?
हा कूपमंडुकांचा निव्वळ जमाव येथे!" >>> यातील 'ह्यांना' हे कोणाला उद्देशून आहे ?

यातील 'ह्यांना' हे कोणाला उद्देशून आहे ?<<<

वरचे प्रतिसाद वाचून वैवकुंना असावे असे वाटत आहे.

बेफीजी,
"वरचे प्रतिसाद वाचून वैवकुंना असावे असे वाटत आहे." >>> पण तो शेर प्रतिसाद देण्याआधी लिहिला आहे.
असो.... प्रोंं.च्या उत्तराची वाट पाहूया.

Pages