एकेक तुझा शब्द मला उपहास वाटतो!

Submitted by profspd on 5 June, 2014 - 11:13

एकेक तुझा शब्द मला उपहास वाटतो!
शब्दातच वैगुण्याचा अधिवास वाटतो!!

श्वास घेतल्यासमान लिहितो मी गझला रे.....
गझल आज आत्म्याचा माझ्या ध्यास वाटतो!

तूच सोबतीस नसे, जन्म वाटते शिक्षा....
विरहाने जन्म उभा हा वनवास वाटतो!

मंत्रमुग्ध मी झालो, प्रेमात तुझ्या पडलो....
चेह-यात एकेका तव आभास वाटतो!

रोज रोज जिंदगीस घेतो मी समजोनी.....
जगणेही आज एक मज अभ्यास वाटतो!

काळाचे गणित मला कळत अता का नाही?
वर्तमान काळ कसा मज इतिहास वाटतो?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users