सांडू नकोस वा-या माझे पराग येथे......

Submitted by profspd on 5 June, 2014 - 07:35

सांडू नकोस वा-या माझे पराग येथे......
खडकाळ ही भुई, ना फुलणार बाग येथे!

मुर्दाड गाव आहे, का फोडतोस डोके?
येणार ना कधीही कोणास जाग येथे!

नामोनिशाण नाही उरले अरे, घराचे....
थैमान घालते बघ अद्याप आग येथे!

झोळी तुझी रिकामी, हे गाव योग्य आहे....
माधोकरी अता तू निर्धास्त माग येथे!

गझलेत शेर नाही, आहेत तोफगोळे.....
झाले टवाळ भारी, तू तोफ डाग येथे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users