निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिठ बहरतं? Light 1 काय पण लोकं कामाला लावुन देतात?:P Proud

छान आहे पण.... कोस्टल एरीया मुळे तुम्हालोकांना नेहमीच दिसत असेल नाही!...

सायली Proud

jipsee varil photo kuthale aahet ?>नुतन, उत्तन येथील फोटोज आहेत. Happy सध्या भांडूप, ऐरोली परीसरातही दिसत आहेत. Happy

हल्ली आमच्याकडे हवं तेव्हा आभाळ भरुन येतय आणि सरी बरसवून जातय. परवा तर गाराही बरसल्या. जराश्या गोळा करून लेकाला खायला दिल्या.
काय रे, किती शेंबडा झालास? म्हणाले की म्हणतो तूच सांगितले होतेस ना गारा खा म्हणून.

मधूनच पिवळंधमक ऊन चमकलं की आम्ही आपलं परसबागेत बाकडं टाकून उन्हात पटकन न्हाऊन घेतोय, अन लोक टॅनिंग करतात.

मिरा रोड परीसरात पुर्वी मिठागरे होती. रेल्वेतूनच दिसायची.
पण माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत तयार होणारे मीठ कमी प्रतीचे असते. टाटांपासून बहुतेक कंपन्या गुजराथमधून मिठाची घाऊक खरेदी करतात.

मिरा रोड परीसरात पुर्वी मिठागरे होती >>> हो अगदी स्टेशनच्या फलाटाला लागुनच होती. गेली २ वर्षे मीठाची शेती बंद केली आहे कदाचीत कोण्या बिल्डरने ती जमीन घेतली असावी येत्या दोन एक वर्षात त्याजागी मोठ्या वसाहती झालेल्या दिसतील सॉल्ट एव्हेन्यु ,सॉल्ट हाईट वैगरे Sad

नितिन, बहारोंके सपने ( राजेश खन्ना, आशा पारेख ) मधले एक गाणे त्या मिठागरांजवळ चित्रीत झाले होते असे आठवतेय.

अच्छा मला वाटलं की कोकणात असता तुम्ही... पण मला मुसळधार पावसाची फार भीती वाटते.. अगदी लाहानपणी पासुन... म्हणजे पाउस आवडतो पण मुस़ळधार नाही.....

हेमा ताई, जागु अभिनंदन... पण हेमा ताई ती लिंक ओपन होत नाहीये त्यमुळे लेख वाचु नाही शकले.....

जिप्सी, कोड्याची कल्प्ना, उत्तर आणि फोटो तिन्ही सुन्दर.
जागू, धन्यवाद.
सायली, अग माबो वर जो " कहाणी बेगमीच्या लोणच्याची " म्हणुन टाकला होता तोच आहे तरी सुद्धा मटाची लिन्क खाली देत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/36210744.cms

मिठागरे पार वसईपर्यंत होती. गोगटे salt कंपनी नालासोपारा (वेस्ट) येथे होती, अजूनही असेल. आता नालासोपारा सोडून पावणेअकरा वर्षे झाली.

मला छळणार्‍या सगळ्यांचं घर उन्हात बांधणार आहे मी Proud

बरं हे सापसुरळी खरच काय प्रकार असतो?
साप आणि पालीचं मिक्स्चर असतं का?
फोटो बिटो न दाखवता काय ते सांगा.

मी कधीच नाही पाहिली साप सुरळी. मला सरपटणारी कोणतीच गोष्ट आवडत नाही Sad किळस येते Sad
आणि त्यात ही मोना वर्णन पे वर्णन Proud

असो! निसर्गात किती सारे जीव आहेत Happy किती जीवांना जपतो नाही निसर्ग????
आता पावसाळ्यात गांडुळ आणि पैसा बाहेर पडतील. उन्हाळ्यात कुठे असतात हे, जमिनीखाली ऑक्सिजन कुठुन मिळत असेल त्यांना? देव जाणे Happy

आमच्या ऑफिसातल्या प्रत्येक झाडाला मुंगळ्यांचे थरच्या थर चिकटलेले दिसतायेत. नुसती लगबग लगबग चालू असते. आणि केवढाली ती वारुळं त्यांची Happy
मुंग्या मात्र तिथे आसपासही फिरताना दिसत नाहीत. पण जिथे मुंग्यांचे थर आहेत तिथे थोडे थोडे मुंगळे फिरकताना दिसतात.
असं का बरं असावं?

मी माझ्या मित्राला याच उत्तर देताना सांगत होते की मुंगी आणि मुंगळे यांच्या वस्तीतले मुंगळे हे डॉन लोकं असतील Proud भारी मगज असलेला भाग त्यांनी स्वतःचा इलाका म्हणून निवडला असेल. मुंग्या बिचार्‍या घाबरून त्यांच्या इलाक्यात जात नसतील पण मुंगळे भाई लोकं असल्याने मुंग्यांच्या इलाक्यातला ऐवजही हडपत असतील Proud Lol तो म्हणाला गप्पे Uhoh

Pages