निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिकोमा म्हणजे उंचावरचं दह्यादूधाचं मडके फोडण्यासाठी बाळ गोपाळांनी रचलेली उतरंड आणि अलमांडा म्हणजे
प्रसादासाठी हात पसरलेलं लहान मूल... अशी वर्णने.. फुले विसरताच येणार नाहीत.++++ आ हा हा! काय सुंदर उपमा दिली आहे...

जिप्सी अभिनंदन.....:-)

जागु, ६ / ७ जुन मधे गोंधळले होते.... उद्या मॄग नक्षत्र आहे नाही! लोणावळाचे फोटोज छान आहे.....

जागू, त्या धबधब्याखालून पण एक ट्रेक करतात धाडसी लोक. बराच अवघड आहे.
अगदी लहानपणापासून तो बघतोय. पुर्वी एस टी तिथे दोन मिनिटे थांबायची. आता हायवेवर थांबायला परवानगी नाही.

जागू, त्या धबधब्याखालून पण एक ट्रेक करतात धाडसी लोक. बराच अवघड आहे.>>>>हो मायबोलीकरांनी केलाय तो ट्रेक. (यो रॉक्स, झकासराव, विशाल कुलकर्णी, राज्या, विनय भिडे, इंद्रधनुष्य इ. इ.)

थांबा आता तुमची सगळ्यांची नावं मी दिनेशदांना सांगणार.(मला शिकवत नाही काय? ) Uhoh Lol
दिनेशदा, इथली हुशार मुलं ना मला काही शिकवत नाही. भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्याय्य्य्यय्यय्य्य्यय्य्यय्य. Sad

अगं, पिकासाचे लेटेस्ट व्हर्जन घे. त्याच्या खाली मेक कोलाज असा एक ऑप्शन आहे. तो ओपन कर. मग तिथली चित्रे त्या ठिकाणी ड्रॅग कर. तिथे ती रीसाईझ करता येतात. झाले कोलाज.

जिप्स्या अभिनंदन रच्याकने कधी तरी पार्टी दे म्हणजे आनंद साजरा करु Wink
शोभा उगी उगी
हे http://pixlr.com/express/ वापरुन पहा. कोलाज वर क्लिक करुन पुढे आर अन डी कर.
दा - बाळ गोपाळांनी रचलेली उतरंड... प्रसादासाठी हात पसरलेलं लहान मूल... > वा किती सुंदर उपमा.

नमस्ते निगकर्स! लिहिता येत नाही पण रोमात असण्याचा प्रयत्न करते. सुमंगलजी हो हे छानच आहे पण आपल्या आजुबाजुला घडणार्‍या निसर्गकथा आम्हालाही सांगा ईथे. Happy

कधी भेटतोयस बोल. पाहिजे ती पार्टी देतो. >> अरे फक्त मला नाही रे सर्व निगकरांना पावसाळ्यात एक गटग करुया की Happy

शशांकने सांगितलेली वृश्चिक रास काल मला दिसली. काल कॉलनीतले लाईट गेले होते आणि ढगही नव्हते.
रात्री साडेआठला जवळजवळ डोक्यावरच होती. अंधार असल्याने तिच्या उजवीकडे पण काही नक्षत्रे दिसत होती.

अरे फक्त मला नाही रे सर्व निगकरांना पावसाळ्यात एक गटग करुया की>>>>ओक्के डन Happy

गेल्या शनिवारी रात्री रायलिंग पठारावर टिपलेला हा फोटो. आकाशगंगा आणि आमचा टेन्ट. Happy

अरे निगच्या गप्पा नि या भागातले फोटो मस्त आहेत एकदम Happy

जिप्सी .. मला आधी कळालंच नव्हतं काय फोटो आहे वरचा .. अर्धाच आहे की काय असं वाटलं .. सही आलायं Happy

मस्त फोटो, आपल्या डाव्या हाताला जे तीन तारे दिसताहेत तिच वृश्चिक राशीची शेपटी बहुतेक. वरच्या नांग्या फोटोत नाहीत.

त्या स्मायली सह्हीए >>>+१ खास करुन तो मधला

आकाशगंगा आणि आमचा टेन्ट >>> वा मस्त आलाय प्रचि तो टेन्ट परग्रहावरच यान वाट्तय.
येव्हडे निरभ्र आकाश तारे तुटताना दिसले असतील ना.

जे तीन तारे दिसताहेत तिच वृश्चिक राशीची शेपटी बहुतेक. >>> यात मी फुल अज्ञानी मला सगळेच सारखे दिसताहेत Lol

इथे आता कडक उन्हाळा चालु झाला आहे. मि बाल्कनिमध्ये एक मनिप्लान्ट टांगला आहे. गेले दोन तिन दिवस पाणि घालताना चिमणि चिवचिवत बाहेर पडलि. बहुतेक तिने अंडि घातलि असावित. मला कळ्त नाहि, पाणि घालु कि नको. कडक उन्हाने प्लाण्ट सुकायला नको आणि अंड्यांचे नुकसानहि नको. काय करु? प्लिज सुचवा

सायलिने कमि पाणि घाल असे सुचवले आहे. पण उन्हाळा कडक आहे. आणि अंड्यांना तेवढे पाणिहि चालेल का?

झाडाला आवश्यक तेवढे पाणी घाला. अंडे सुरक्षित नाही असे वाटले तर चिमणी दुसरे घरटे करेल पण झाडाला तो पर्याय नाही.

राया.. डायरेक्ट कुंडीत पाणी घालण्याऐवजी एका पिशवीत पाणी भरुन पिशवीला छोटे भोक पाडुन कुंडीत ठेवा..म्हणजे झाड ही नाही सुकणार आणि अंडीही नीट रहातील

Pages