मदत हवीय

Submitted by कमलेश पाटील on 4 June, 2014 - 02:32

कोणीतरी मला डाव, भाव असे शब्द मला गझलेसाठी सुचत नाही आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहिही लिहा हो, चाल्तंय आजकाल.. लगालगा गलागला संभाळा म्हणजे झालं.
काय तर म्हणे हृदय माळ.. कसं ते माळायचं ? दोन्ही बाजूच्या आर्टरीज गळ्याभोवती गुंडाळून मागून गाठ मारायची का ? धडधडणारं लॉकेट.. हिट्ट फ्याशन आयटम होईल.

असं नाही. पद्धतशीर :
आव, काव, गाव, घाव, चाव, ठाव, डाव, नाव, ताव(कागदाचा/उष्मा), दाव (दाखव या अर्थाने), धाव, नाव, पाव, बाव (विहीर), भाव. माव (माया), राव, लाव, वाव, साव, हाव.

काव - काकध्वनि
काव - गेरू
काव - कावणे या क्रियापदाचा धातू
काव - कुत्र्यासाठी पोर्तुगीज शब्द

म्हणजे बघा श्लेष का काय तो साधता येईल...

लिहाच..

मला दुसरा, चौथा आणि शेवटून तिसरा.. शेर फार आवडले.. अशी स्ट्याण्डर्ड प्रतिसादाची ओळ तयारच ठेवलीय.

काय तर म्हणे हृदय माळ.. कसं ते माळायचं ? दोन्ही बाजूच्या आर्टरीज गळ्याभोवती गुंडाळून मागून गाठ मारायची का <<< Lol

मला दुसरा, चौथा आणि शेवटून तिसरा.. शेर फार आवडले.. अशी स्ट्याण्डर्ड प्रतिसादाची ओळ तयारच ठेवलीय.

हे भारीय.

आता बघा,
सडा हाच शब्द घ्या
कितीतरी अर्थ आहेत..
एकटा, अंगणात घालतो तो, सडणे या क्रियापदाचे आज्ञार्थी रुप, कोकणातली उंचावरची सपाट जागा.
कित्ती ती अर्थानर्थाची वलये... !

सडाफटींगवाला सडा पण !!!!!

हाव,नाव,गाव्,डाव्,चाव,लाव,पाव,दाव(दाखव या अर्थी)

मी वर दिलेत ते पर्याय बरोबर आहेत का? मी खरच विचारतेय

कमलेश, तुम्हीही तयार जमिनी हडपायला का सुरू करत नाहीत. नुसते काफिये घेऊन पुन्हा बाकीची मशागत करण्यापेक्षा!

म्हणजे जे करतात, त्यांना जमते असे म्हणायचेय का ?
सोप्पी रेसिपी आहे. शेवटचे शब्द जुळवायचे. छटाकभर प्रेम, पावशेर करुणा आणि मणभर आत्मस्तुति आणि तेवढीच जननिंदा... काला करून दळायचा !

दिनेशदा.. Lol

आज दोन-दोन 'पॉपकॉर्न धागे' आलेत माबोवर...
बाकी अशा प्रकारची मदतपण लागते लोकांना? हाही एक चांगला सर्विस बिझनेस होऊ शकतो असे दिसते.
(दिनेशदा तुमचे मार्गदर्शन लागेल.) Wink

हो गिरीकंद.. पण स्वतःवरच ! म्हणजे एवढ्या अजरामर कलाकृती माझ्यादेखत निर्माण होताहेत आणि म्या पामराला त्यातले काहीच कळू नये... धरणीमाता पण पोटात घेत नाही... बरं घेतलंन तिने तर तिच्या गर्भात मी सेफ नाही राहणार ना !

दिनेशदा,
धर्माचे सोडा.माझा संबंध कारणांशीच जास्त असतो... आणि इथे तिही कुठे कळतायत..म्हणून थोडा गोंधळलो हो...

धीर धरा.. आता आपल्याकडे स्वतःचा सूर्य आहे. म्हणजे जे न देखे रवि, ते देखे कवि ... म्हणायचीही सोय नाही राहिली !

दिनेशदा..

तुम्ही समस्त गज़लकारांचा , गज़लांचा , कवितांचा आणि कविंचा अपमान केला आहे !

आम्ही तुम्हाला सायबेरियात पाठवून देतो Happy Lol

Pages