जन्मत: मी आरशाची काच होतो!

Submitted by profspd on 3 June, 2014 - 06:27

जन्मत: मी आरशाची काच होतो!
का बरे याचा जगाला जाच होतो?

नाव ते बघतात मग देतात शेरे.....
त्रास मजला नेहमी याचाच होतो!

फक्त खुर्ची खूप मोठी, तोच मी, पण
पद बडे पण, मी तसा साधाच होतो!

एवढा लाचार मी नाही बघितला....
नेहमी जो लांछनास्पद लाच होतो!

रेशमी माझी गझल आहे मुलायम....
कैक धेंडांना तिचा का काच होतो?

या पिढ्यांना एकदा समजेल नक्की.....
मीच गझलेतील पालव पाच होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव ते बघतात मग देतात शेरे.....
राग मजला नेहमी याचाच येतो!<<< रदीफच बदलली आहे साहेबा!

एवढा लाचार मी नाही बघितला....
नेहमी जो लांछनास्पद लाच होतो!>>>>>>>>>>

ह्याचा अर्थ काय प्राचार्य ( मला माहिती नव्हते तुम्ही प्राचार्य झाल्याचे )

जन्मत: मी आरशाची काच होतो!
का बरे याचा जगाला जाच होतो?>>>>>>

आरसा होतो म्हणलात तर ठीक आहे, पण आरशाची काच होतो हे काही जमले नाही

पाच पालव म्हणजे पंचप्राण/अंत:करण पंचक......मन, बुद्धी, चित्त, अहंकार, व अंत:करण!

काल होतो मी तसा साधाच होतो!

गोंधळयुक्त मिसरा!

शेरच बदलून लिहिला आहे, आता गोंधळ वजा व्हावा!