कळे न का अद्याप आत हे घुमते वादळ?

Submitted by profspd on 3 June, 2014 - 04:20

कळे न का अद्याप आत हे घुमते वादळ?
हेच खरे की, मला वादळी करते वादळ!

भ्याडच आहे म्हणून करते गनिमी कावा.....
चोरपावलांनी का भवती फिरते वादळ?

अलीकडे मी शांत रहाया शिकलो आहे.....
जरी काळजामध्ये माझ्या असते वादळ!

कधी कधी निष्ठूर, आंधळे इतके होते.....
गरिबांच्या वस्तीत प्रथम ते शिरते वादळ!

दुनियेसाठी जिचे तेवणे अखंड चालू.....
त्या पणतीला स्वत: होउनी जपते वादळ!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलीकडे मी शांत रहाया शिकलो आहे.....
जरी काळजामध्ये माझ्या असते वादळ!

कधी कधी निष्ठूर, आंधळे इतके होते.....
गरिबांच्या वस्तीत प्रथम ते शिरते वादळ!

दुनियेसाठी जिचे तेवणे अखंड चालू.....
त्या पणतीला स्वत: होउनी जपते वादळ!<<< चांगले शेर, आवडले.