काय सुखाने मिळते आहे

Submitted by जयदीप. on 2 June, 2014 - 23:47

डोळ्यामध्ये दिसते आहे
भिंत मनाची पडते आहे

काय सुखाने मिळते आहे
मन शब्दातच रमते आहे

बदल असा मी केला आहे
बघतो जे जे घडते आहे

हल्ली मी समजावत नाही
नशिब सदोदित रुसते आहे

शांत मनाचा झालो आहे
बिंग सुखाचे फुटते आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान