वर्तुळे

Submitted by विजय दिनकर पाटील on 2 June, 2014 - 10:30

मनांची मोडलेली वर्तुळे जोडून जाताना
कशाची खंत नाही राहिली येथून जाताना

अधोरेखीत झाले दोष माझ्या पोहण्यामधले
तुझ्या डोळ्यांतल्या लाटांसवे वाहून जाताना

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना

तुझीही हार माझाही पराभव ह्या निरोपाने
तुला घेऊन येतो मी मला सोडून जाताना
---------
विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा
सगळे शेर आवडले

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना<<< हा आधी कळला नाही मग पुन्हा वाचला मिस्कील वाटला खूप आवडला

धन्यवाद

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना<<< व्वा व्वा

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना<<< मस्त

शेवटचा अजून लक्षात आलेला नाही, पुन्हा वाचतो.

गझल आवडली.

जमीनही आवडली, काफिया रदीफ ह्यांचे काँबिनेशन छान आहे.

शेवटचा अवघड आहे पण मला बहुधा समजला
फोटो तरही च्या प्रकारात एक चित्र होते एक मुलगा एक मुलगी एका रस्त्यावर मधोमध आहेत विरुद्ध दिशेला निघाल्यासारखे एकमेककडे पाहत आहेत एकमेकांचे हातात हात आहेत ..तसा काहीसा आहे हा शेर

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना...व्वा.

आवडलीच गझल.

गझल आवडली

खेटून्,लोंढ्यातून... खूप छान

आवडली. बारकाईने वाचावी लागली पण हळूहळू 'असर' करणार्‍या वाईनसारखे शब्द भिनत गेले. वाहून, खेटून, सोडून फारच भावले. ऐकायलाही उत्कृष्ट वाटेल असे वाटत आहे.

अधोरेखीत झाले दोष माझ्या पोहण्यामधले
तुझ्या डोळ्यांतल्या लाटांसवे वाहून जाताना <<< व्वा व्वा

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना >>>> मस्त.

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना

व्वा व्वा.
मत्लाही उत्तम.
धन्यवाद.

समीर

गझल आवडली.

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना

हा बहुदा ग्लुकोमाचा प्रॉब्लेम असणार... Happy

विजयभाऊ, सुंदर गझल.

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना>>>>> वाह! एकदम अप्रतिम.