भले लोक ठेवोत तुम्हास नावे....

Submitted by profspd on 2 June, 2014 - 07:53

भले लोक ठेवोत तुम्हास नावे....
असे दान द्यावे, न कोणा कळावे!

घरी चूल ज्यांच्या सदा बंद असते.....
अशांना अरे, तोंडचे घास द्यावे!

भले फक्त काटेच वाट्यास येवो....
फुलासारखे जन्मभर दरवळावे!

करू का तमा अंध या डोळसांची?
ख-या आंधळ्यांची छडी मात्र व्हावे!

महामार्ग, रस्ते, किती पायवाटा......
तुझे थांगपत्ते कुणाला पुसावे?

तुला वाहिली जिंदगानीच माझी.....
तरी का तुझ्यास्तव असे मी झुरावे?

कशाला स्वत:ला स्वत: त्रास द्यावा?
कशाला उरी राग, मत्सर धरावे?

हटकणार नाही कुणीही कधीही.....
अशा फक्त स्थानावरी तू बसावे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भले फक्त काटेच वाट्यास येवो....
फुलासारखे जन्मभर दरवळावे!

कशाला स्वत:ला स्वत: त्रास द्यावा?
कशाला उरी राग, मत्सर धरावे? >>> हे दोन सर्वात छान वाटले.

-----------------------------------------------------------------------------------
"भले लोक ठेवोत तुम्हास नावे...." >>> माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार या मिसर्‍यातील ’तुम्हास’ या शब्दामुळे वृत्त गडबडले असावे वाटते.
'तुम्हास' हा शब्द उच्चरताना 'तु' वर जोर दिला जात नाही.