काळजामधे फिरून आस पालवे नवी!

Submitted by profspd on 2 June, 2014 - 04:13

काळजामधे फिरून आस पालवे नवी!
पानगळ सभोवती परंतु आत पालवी!!

रूप देखणे तिचे करेल वश कुणासही.....
लाल लाल गाल त्यावरी खळीच लाघवी!

माझिया कलेवरास लाभले कफन नवे.....
हिंडली हयात सर्व चौदिशांत नागवी!

जो मिळेल भाव त्यात फुंकले स्वत:स मी.....
खूप वाटले मला मिळेल मोल वाजवी!

भाउबंदकीमुळेच मोडतात रे घरे....
खानदानही करेल नष्ट हीच यादवी!

माणसाळलेत हिंस्रही पशू अलीकडे....
वर्तणूक माणसा तुझी अजून पाशवी!

सोबतीस तू नव्हे, परंतु वेदना तुझ्या....
वेदना मला तुझीच वाटते हवीहवी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझिया कलेवरास लाभले कफन नवे.....
हयात हिंडली तमाम चौदिशांत नागवी!<<<

चामरचे कलिंदनंदिनी झाले आहे दुसर्‍या ओळीत! वृत्ताच्या कलेवराला कफन आवश्यक आहे.

भाउबंदकीमुळेच मोडतात रे घरे....
खानदानही करेल नष्ट हीच यादवी! >>>> यादवी नेहमी एका खानदानात च असते. खानदान शब्दाला "ही" लावायचे काय कारण?

धन्यवाद दुरुस्ती केली आहे!

हे देवराज/चामर वृत्त आहे.....
गालगाल/गालगाल/गालगाल/गालगा


कलिंदनंदिनी: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा

.............प्राचार्य सतीश देवपूरकर

धन्यवाद दुरुस्ती केली आहे!

हे देवराज/चामर वृत्त आहे.....
गालगाल/गालगाल/गालगाल/गालगा

कलिंदनंदिनी: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा<<<

अहो जे मीच तुमच्या गझलेतील चूक म्हणून तुम्हाला दाखवून दिलेले आहे ते मलाच नव्याने शिकवल्यासारखे काय सांगताय?