माझिया डोळ्यांवरी ना भूल आहे!

Submitted by profspd on 2 June, 2014 - 04:04

माझिया डोळ्यांवरी ना भूल आहे!
ओळखू येते तुझी मज झूल आहे!!

काळजाची गच्च भरलेलीच परडी....
वाटतो प्रत्येक काटा फूल आहे!

लोटलेले दारही हलते कसे हे?
वाटते की, ही तुझी चाहूल आहे!

वृद्ध मी झालो तरीही तीच माया.....
आजही आई समजते मूल आहे!

काळ हे सगळ्यावरी औषध म्हणाले......
का उरी अद्याप माझ्या शूल आहे?

हात ना पसरायची ही भूक माझी.....
बंद केव्हाची घराची चूल आहे!

ऊब सारी टाकली वाटून माझी.....
माझियापाशी न आता वूल आहे!

आजवर हुलकावण्या तर बघत आलो.....
ही नव्याने तू दिलेली हूल आहे!

रक्त आटवतो कशाला मी फुकाचे?
आपल्यामध्येच तो मशगूल आहे!

जाहला नुसता वयाने फक्त मोठा....
आजही कानात त्याच्या डूल आहे!

काळजामधुनीच लिहिल्या सूक्ष्म ओळी....
अर्थ तू घेतोस तो तर स्थूल आहे!

लोक शब्दांनाच का चिवडीत बसले?
शब्द म्हणजे शायराचे टूल आहे!

तू नको विसरूस दुनिये, शेर माझे....
तो तुझ्या-माझ्यातला तर पूल आहे!

धून गझलेची अहोरात्रीस सुचते.....
माझिया हृदयामधे बुलबूल आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक आहेत!!!!!!!!! Happy

वृद्ध मी झलो तरीही तीच माया.....>>> "झलो" म्हणजे काय?

ऊब सारी टाकली वाटून माझी.....
माझियापाशी न आता वूल आहे! >>>> बुल शब्दावरुन पण करा ना काहीतरी प्रोफेसर.

जाहला नुसता वयाने फक्त मोठा....
आजही कानात त्याच्या डूल आहे!>>>> कुठल्या कानात आहे?

धून गझलेची अहोरात्रीस सुचते.....
माझिया हृदयामधे बुलबूल आहे! >>>> काळरात्र असते बाकीच्यांसाठी तुमचा रतीब म्हणजे.