म्हणू नये कधीच की, मला न हे जमायचे!

Submitted by profspd on 1 June, 2014 - 00:25

म्हणू नये कधीच की, मला न हे जमायचे!
मनातल्या मनात घोक हे मला करायचे!!

स्वत:मधे बदल घडव जगास बदलण्यापरी....
शिकून घे कसे जगात याच रे, रुळायचे!

कमीपणा न मानतो कधीच सूर्य यामधे....
प्रकाश देत देत जाणतो कसे ढळायचे!

बराच वेळ जाहला निघायला हवे मला.....
घरातले उगाच काळजी करत बसायचे!

नको असेल जर कुणा, कशास जायचे तिथे?
निमंत्रणाविना कुठे चुकूनही न जायचे!

मिळेल वा मिळो न फळ, न काळजी मला कधी....
प्रयत्न सोडणार ना कधीच हे झटायचे!

मढे कधी म्हणेल का? नकोस पेटवू मला....
सरण कधी म्हणेल का? मला न रे, जळायचे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको असेल जर कुणा, कशास जायचे तिथे?
निमंत्रणाविना कुठे चुकूनही न जायचे! >>>>>>> हे जरा मनापासुन शिकुन घ्या ना प्रोफेसर