तोल स्वत:चा सावरला मी ढळता ढळता!

Submitted by profspd on 31 May, 2014 - 15:05

तोल स्वत:चा सावरला मी ढळता ढळता!
नजर चुकवुनी पुसले अश्रू वळता वळता!!

काळिज माझे चेतवून मी मशाल केली!
उजेड केला वाटसरूंना जळता जळता!!

थांब जीवना, नकोस इतके पळवू मजला.....
थकले रे आयुष्य किती हे पळता पळता!

जाते माझे, दळणारा मी, मीच भरडतो....
पण ओठांवर गाणे होते दळता दळता!

बरेच उडले शिंतोडेही अंगावरती....
बरेच शिकलो दुनिये पण मी मळता मळता!

प्रवास बाहेरून आत मी बराच केला.....
जन्मच सरला मलाच मी पण कळता कळता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाते माझे, दळणारा मी, मीच भरडतो....
पण ओठांवर गाणे होते दळता दळता! >>>>> बरोबर आहे, तुमचेच जाते आहे, तुम्हीच गजलांचे पीठ पाळता आहात, पण आम्ही भरडलो जात आहोत त्याचे काय?

बरोबर आहे, तुमचेच जाते आहे, तुम्हीच गजलांचे पीठ पाळता आहात, पण आम्ही भरडलो जात आहोत त्याचे काय?
<<<<<<<<<<मग सुपातच बसा हसत!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद