मी राहतोच मागे, पळते पुढेच भाकर....

Submitted by profspd on 31 May, 2014 - 09:57

मी राहतोच मागे, पळते पुढेच भाकर....
आजन्म मी भुकेला म्हटले जराच दम धर!

या गुळमुळीत गप्पा, नाही फलीत काही.....
तुकडाच आज पडू, झाले बरेच जर-तर!

मी दूध ठेवलेले फडताळ बंद होते.....
बोका पिऊन गेला, बदनाम मात्र मांजर!

हौशे, कितीक गवशे, नवशे गझल मिरवती.....
भट सोडता कुणीही झाला न रे, सिकंदर!

आता तिला विसरणे आहे अशक्य मजला....
मी कोरले प्रियेला केव्हाच काळजावर!

आंघोळ आणि जेवण करण्यास फक्त उठतो.....
बाकी दिवसभरी मी असतोच कॉम्प्युटरवर!

ती सांडते भुईवर बघ, चांदणे असे की,
आकाश उतरलेले वाटे जणू धरेवर!

बळिराज तू स्वत:ला म्हणतोस कागदावर.....
हातामधे कधीही धरलास काय नांगर?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दूध ठेवलेले फडताळ बंद होते.....
बोका पिऊन गेला, बदनाम मात्र मांजर! ................. बढिया. जाम आवडला.

हौशे, कितीक गवशे, नवशे गझल मिरवती.....
भट सोडता कुणीही झाला न रे, सिकंदर! ................. भटांचा नंबर माझ्यानंतर लागतो.

आंघोळ आणि जेवण करण्यास फक्त उठतो.....
बाकी दिवसभरी मी असतोच कॉम्प्युटरवर! ................. आंघोळ आणि जेवण वगळता दिवसातील बाकी सर्व कार्य कॉम्पुटरवर?

बळिराज तू स्वत:ला म्हणतोस कागदावर.....
हातामधे कधीही धरलास काय नांगर? ................. आता जमाना लईच बदलला. नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरट करायला नांगर नव्हे तर स्टेरिंग हातात धरावे लागते. त्यामुळे हा कालबाह्य शेर झाला आहे.

नांगर हे प्रतिक आहे, हे सांगायची आवश्यकता होती? वाचकालाही थोडीफार जाणीव असू शकते, हे गृहित धरायला काय अडचन आहे?

नांगरणी केली काय? नांगर चालवला काय? नांगरता येतं काय?
अशा पद्धतीने हे प्रतिक वापरता येऊ शकते ना?

"नांगर हातामध्ये धरणे" असेच प्रतिक वापरले पाहिजे काय?

ज्येष्ठ बंधू सारंग भणगे ह्यांनी पूर्वी एका रचनेवर दिलेला अभिप्राय आठवला..

"'च'वर इतका जोर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतसुद्धा दिला गेला नसावा !"

देवसर,

मला ही रचना वाचून रेतीचे लाडू वळण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटलं. किती चिवडलं पण काहीही उपयोग झाला नाही.
सॉरी.

@रसप - मी रेतीचे लाडु सुद्धा एकवेळ खाईन, पण ह्या गजला म्हणजे ....

आंघोळ आणि जेवण करण्यास फक्त उठतो.....
बाकी दिवसभरी मी असतोच कॉम्प्युटरवर! >>>>>> अजुन काही बेसिक गोष्टी तरी कॉम्पुटर वर करु नका प्रोफेसर.

जरूर!

जे पाहिजे तुला ते, तू वाच पान माझे
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!

माझ्या 'रानफुले' या एकुलत्या एक गझलसंग्रहातून! (१९८८)

.................प्राचार्य सतीश देवपूरकर