जीवघेणे खेळ तू खेळू नको

Submitted by जयदीप. on 31 May, 2014 - 03:45

जीवघेणे खेळ तू खेळू नको
बोल आता, गप्प तू राहू नको

हाकही ऎकू तुला येऊ नये
एवढे अंतर मला देऊ नको

तू मनाचा आरसा पाहून घे
चेहर्‍यावरती कधी भाळू नको

ढील दे नात्यास तू थोडातरी
ते अपेक्षांएवढे ताणू नको

एकदा डोळे तुझे उघडून बघ
तू तुझ्या विश्वामधे राहू नको

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा डोळे तुझे उघडून बघ
तू तुझ्या विश्वामधे राहू नको<<< वा

ढील दे नात्यास तू थोडीतरी - असे हवे आहे बहुधा - ओळ आवडली, पण दुसरी ओळ प्रेडिक्टेबल वाटली (तूर्त तरी)

कृपया गैरसमज नसावा, पण माझा एक जुना शेर आठवला.

सुखे छाटून थोडीशी पुन्हा येईन माघारी
पतंगासारखी देता जराशी ढील दु:खांनो?

गझल छान झाली आहे. शुभेच्छा!

-'बेफिकीर'!