हो जरी नसले तरी नसतेच ना ही

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 May, 2014 - 01:12

सौख्य नाही कोणतेही दु:ख नाही
जीवनाचे पाहिजे उद्दिष्ट काही

वागण्यातुन कोणता निष्कर्ष काढू
हो जरी नसले तरी नसतेच ना ही

कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही

बोलण्याला भीकही घालू नको पण..
हात जर धरला कुणी.... सरसाव बाही

कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही

उगवतो पूर्वेस ढळतो पश्चिमेला
का दिशा मग राखल्या असतील दाही

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही

व्वा.

कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही

छान.

जमीन आशयासोबत जाते ही खूप चांगली गोष्ट आहे.

छान

वागण्यातुन कोणता निष्कर्ष काढू
हो जरी नसले तरी नसतेच ना ही

कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही

कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही

मस्तच .

छान

धन्यवाद !!

>>>>जमीन आशयासोबत जाते ही खूप चांगली गोष्ट आहे.<<<<

समीरजी, बेफिजी विशेष .

-सुप्रिया.