काफियांचा काफिला (कविता)

Submitted by UlhasBhide on 30 May, 2014 - 07:45

ही कविता असली तरी आकृतीबंध गझलेचा असल्याने,
तसेच यात गझलेतील काही संज्ञा, संदर्भ आले असल्याने
वाचकवर्गात ’गझल विभाग’ समाविष्ट केला आहे.

काफियांचा काफिला (कविता)

शेपाटत काफिया-काफिला कोण चालला ?
शायर की, हा कुणी गुराखी भांग-झोकला !

मांड ठोकुनी मिसर्‍यांवरती, स्वैर दौडता
कळे न त्याला रिकीबीतुनी पाय निसटला

बांधुन मुसक्या, ’जमिनी’मध्ये शब्द गाडता
शेरामध्ये खयाल असतो हेच विसरला

बहर, काफिया, अलामतींची रिती बुडकुली
थंड चुलीवर भातुकलीचा खेळ मांडला

चवीपरीने खाणार्‍याला कसे रुचावे !
शिळ्या कढीला कितीही जरी ऊत आणला

.... उल्हास भिडे (३०-५-२०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवीपरीने खाणार्‍याला कसे रुचावे !
शिळ्या कढीला कितीही जरी ऊत आणला

व्वा.
माझ्या भावना पोहोचवल्याबद्दल आभार.
शहाण्यालाच शब्दाचा मार मधे च फार महत्त्वाचा.
आता बहुधा ह्या जमीनीचीही धडगत नाही.

समीर

छान