एक दु:ख हवे माणसाला...

Submitted by मुग्धमानसी on 30 May, 2014 - 07:04

गडद होत जाणार्‍या अंधाराच्या नसानसांत
भळभळणार्‍या, ठसठसणार्‍या अदृष्य चिघळट जखमेसारखे...

वैश्येच्या लाचार हास्यात काठोकाठ ओथंबून ठिबकत, ओघळत राहिलेल्या
अपमानास्पद थुंकीसारखे...

चौकातल्या नागड्या भिकार्‍याच्या कंबरेवर फडफडणार्‍या एकमेव चिंधीत गुंडाळून ठेवलेल्या
विश्वातल्या समस्त भंपक लज्जेसारखे...
.
.
.
एक दु:ख हवे माणसाला... कायम...
त्याच्याच पायाशी घुटमळणार्‍या... त्याच्याच काळ्या सावलीसारखे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच किचकट.. थोडी ओंगळही आहे.. उंहू, नाही आवडली.
तुझ्या नेहमीच्या रचनांच्या जातकुळीची नाही म्हणुनही असेल.

वाचता वाचताच कविता महाजनांनी लिहिल्यासारखी का वाटली मला?

सावलीला इलाजच नसतो गं आणि.. तरी बिचारी त्यातल्या त्यात संधी मिळेल तेव्हा लांब जायचा प्रयत्न करतेच.. काळी वगैरे म्हणणंसुद्धा अन्यायकारक वाटलं..

आवडला मुक्तछंद ,पण हे दुक्खं का हव आहे , हे पण जरा तुमच्या शैलीत add केल असत तर खूप मज्जा आली असती वाचायला

.

कशाला गं माऊ?
दु:ख हवे गं , माणसातला माणूस ओळखण्यासाठी.. सुखाची किंमत कळण्यासाठी... दु:ख हवं पण ते युध्हात रक्तस्नात होउन धारातिर्थी पडलेल्या वीर योद्ध्यासारखं... असं नागव्या भिकार्‍या सारखं ओंगळ नको गं.
हे आपलं माझं मत. तु नेहमी सुंदर लिहितेस... लिहिती रहा Happy