चटका

Submitted by nikhil_jv on 24 December, 2008 - 03:13

प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी प्रेम करतोच असा माझा समज नाही विश्वास आहे. पण प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतच अस नाही. काहीजण प्रेमात पडून विचारायला घाबरतात तर काही जण विचार करुनच प्रेम करतात. पण प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडते हे मात्र नक्की. कधी हे प्रेम आनंद देत, कधी सुख देत तर कधी समाधान पण क्वचितच एखाद प्रेम मनाला चटका लाऊन जात....
आयुष्यात तशा बर्‍याच मुली येतात काही जणी आवडतात काही नाही पण कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी खेळण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. त्या आल्या स्वतःच्या मर्जीने आणि गेल्याही स्वतःच्या मर्जीने. आता जेव्हा घर, ऑफिस, मित्रमंडळी आणि नातलग माझ्या लग्नाच्या मागे लागलेत तर एक अशी मुलगी आयुष्यात आली आहे की जिच्यावर मी मनापासून प्रेम करतोय पण तिला आजुन २/३ वर्ष तरी लग्न करायच नाहिये. पण तिच्या मनात काय चाललय ते मी समजु शकत नाही. कारण स्त्रियांच्या मनात काय चाललय ते ओळखण कठीणच.
माझी आणि तिची भेट नवरात्रीत झाली. मला वाटल ती भेट क्षणभंगुर असेल. पण पुढे तिने माझ्याशी मैत्री वाढवण्यासाठी माझा मोबाईल नं. मागितला. मी तिला दिला. इथपर्यंत फक्त मैत्रीच होती, माझ्या मनातही काही नव्हत. त्यानंतर तिचे रोज फोन येऊ लागले आणि मला वाटत गेल की हिच माझ्यावर प्रेम जडलय. मी एक दिवस तिला भेटायला बोलावल तेव्हा कोजागिरी पोर्णिमा होती इथल्या बर्‍याच मित्रमैत्रिणींना मी त्या भेटीची कल्पना दिली, आणि त्यांनी मला तिला कोणत्या भेटवस्तु घेऊन जाव्यात याबद्दल मार्गदर्शन केल. त्या भेटीत ती मला अजिबातच Comfortable वाटली नाही. कदाचित फोनवर बोलणे आणि प्रत्यक्ष भेटणे यामध्ये काय फरक असतो हे तिच्या वागण्यातून मला जाणवत होत. बराच वेळ फक्त मीच बोलत होतो आणि ती ऐकत होती, पण नंतर जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हातर मला धक्काच बसला. पण त्या भेटीत तिने धक्का दिला तरी मनाशी हे पक्क केल होत की मी तिच्यापासून दूर जाता कामा नये आणि ती त्याप्रमाणे वागली आणि मी तिचा तिच्या अटीसह स्वीकार केला. पुढे तर आम्ही रोजच भेटायला लागलो, ऑफिसमधून तासनतास तिच्याशी गप्पा मारायला लागलो अशा थाटात की लग्न करेन तर हिच्याशीच. ती देखील माझ्याशी तशीच वागायची. पुढे ती माझ्या घरी येऊ लागली आईबाबांशी जवळीक साधु लागली त्यामुळे ही गोष्ट ना त्यांच्यापासुन लपली ना आजुबाजुच्या लोकांपासुन. मग मलाच बदनाम होतोय अस वाटायला लागल. त्यासाठी आईबाबांचा रोष ही ओढवून घेतला. हे सर्व कमी होत की काय तर माझ्या जुन्या मैत्रिणीने मला लग्नाबद्दल विचारल. तशी तिची आणि माझी मैत्री जुनीच पण तिने मला तेव्हा भाव दिला नाही म्हणून मी दुसरीच्या प्रेमात पडलो. मग हिला परत येण्याच कारण नव्हत तरी पण मी तिला दुखावल नाही. पण या सर्व गोष्टींने गैरसमज वाढत गेला. दोघींना एकमेकांबद्दल कळल आणि माझ्यावर बंधन आली. एवढा वेळ बाहेर का? रविवारी घरात का नाहीस? फोनवर कुणाशी बोलतोस? असे अनेक प्रश्न जस माझ स्वातंत्रच गमावून बसलो. तिच्या मनात संशय घर करुन बसला होता. मग रोजच भेटण आठवड्यावर आल तेव्हा मला ही वाटायला लागल की हिला कोणी दुसरा भेटला की काय? मग माझ मनही कशात लागत नव्हत. सतत काय करु आणि काय नको हा प्रश्न मनाला सतवायचा. आईबाबांच्या मर्जीने जाऊ की हिच्या मर्जीने? पुढे आमचा संसार सुखी होईल की नाही या बद्दल जराही विचार केला नाही. फक्त ती ती आणि तीच. तिच्यापुढे कशाचीच काळजी वाटत नव्हती. पण ती खरोखरच माझी होणार आहे का? मी तिच्याच एवढा गुंतत चाललो आहे तिची मार्च मध्ये फायनल एक्झाम आहे त्यानंरत ती स्वतःच्या घरी जाईल ती परत येईल का? सद्या तरी याच विचारात असतो, कारण तिने मला तिची फार सवय लावली आहे. तिचे हसणे, बोलणे, हसताना गालावरची खळी, तसेच मला एका विशिष्ट नावाने हाक मारुन चिडवणे हे मी विसरु शकेन का? मग ती गेली आणि परत आलीच नाहीतर? मग माझ्यासोबत ती टाईमपास करत होती का? मग मी तिच्यासाठी एवढ्या माणसांना दुखावल त्याच काय? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनाला चटका लावून जातायेत.

गुलमोहर: 

कथा? हिला कथा म्हणनं कठीण आहे, पण चांगला प्रयत्न आहे.

बहुतेक कथा क्रमशः आहे. आधी मला वाटले की हे मायबोलीकरांना मदतीचे/सल्ल्यांचे आवाहन आहे आणि चुकुन कथा विभागात टाकलेय Uhoh

मी सुरुवात तर कथा लिहावी म्हणूनच केली होती नंतर नावासकट सर्व लिहिणे मला चुकीचे वाटले आणि गोंधळ झाला. मी अजुन प्रभावीपणे मांडु शकलो असतो पण इथे असे काही प्रसंग घडले की कशाप्रकारे लिहु या संभ्रमात होतो, पण लिहिताना मला तुमचा सल्ला मिळावा हाच हेतु होता.

khup chan lihile aahe...
vachun ase vatale ki me mazhi life chi story vachato aahe......
farak fakt haa aahe k ti collg. madhe nahi tar Job karate aahe....