संपते गाणे तरी मन गात असते

Submitted by जयदीप. on 28 May, 2014 - 10:18

संपते गाणे तरी मन गात असते
शेवटानंतर खरी सुरुवात असते

चार दिवसांचा भुकेला खात आहे
मन असे हल्ली मला का खात असते

राहतो मी नेहमी विश्वात माझ्या
ती सुधा हल्ली तिच्या विश्वात असते

सोडतो मी दूर पण येतेच शोधत
एकटेपण केवढे निष्णात असते

विसरतो मी दुःख अन् नैराश्य माझे
केवढी जादू तिच्या हसण्यात असते

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhaan

’निष्णात’ सर्वात छान.

--------------------------------------------------------------------------
"ती सुधा हल्ली तिच्या विश्वात असते" >>> इथला ’सुधा’ शब्द
मला तरी योग्य वाटत नाही. (सुधा म्हणजे अमृत)
’सुद्धा’ असा शब्द आहे ना ?

(विशिष्ट प्रदेशातील लोक ’सुधा’ असा उच्चार करत
असतीलही परंतु...... )

धन्यवाद उकाका

आणि ती हल्ली तिच्या विश्वात असते

ही आधी सुचलेली ओळ

बरेच वेळा बोलताना सुधा असेच बोलले जाते द्धा वर जोर येत नाही म्हणून तसे राहू दिले आहे

चु भू द्या घ्या

सोडतो मी दूर पण येतेच शोधत
एकटेपण केवढे निष्णात असते

विसरतो मी दुःख अन् नैराश्य माझे
केवढी जादू तिच्या हसण्यात असते

=>
शेर आवडले.