आली न गंधवार्ता ना वृत्त वारल्याचे.....

Submitted by profspd on 28 May, 2014 - 02:24

आली न गंधवार्ता ना वृत्त वारल्याचे.....
नाही मलाच कळले मी प्राण सोडल्याचे!

झालो उजाड त्याला झाली बरीच वर्षे......
नाही स्मरण जराही मी राख जाहल्याचे!

सगळी अपूर्ण स्वप्ने मज लावती तगादा....
ना आठवत मला हे मी गाढ झोपल्याचे!

चोवीस तास आता कामात व्यस्त असतो.....
हे प्रायश्चित्त आहे स्वप्नात झिंगल्याचे!

पंगू असून सुद्धा मी घ्यायचो भरारी.....
भय वाटलेच नाही हे पाय छाटल्याचे!

हा बेगडीपणा अन् हे दंभ मात्र छळते.....
करतात ते प्रदर्शन आभार मानल्याचे!

नाही कधीच आले नावास वलय माझ्या....
ना ऐकिवामधे मी मशहूर जाहल्याचे!

अस्वस्थ कैक होते भात्यात बाण माझ्या.....
मज दु:ख होत नाही ते बाण सोडल्याचे!

मी एक चेक होतो, नुसता पडून होतो.....
मज पाहिले न कोणी प्रत्यक्ष चालल्याचे!

मी वेंधळ्याप्रमाणे बसलो झुलत खुशीने....
नाही मला कळाले गळफास बांधल्याचे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राध्यापक महोदय, खुप काळानंतर आपली गझल (आणि नाव देखील) पहाण्यात आले.
छान आहे मला तरी खुप आवडली. Happy

प्रायश्चित्त <<< ह्या शब्दात वृत्त वारले आहे.>>>

कदाचित ते फेसबुकवरच्या श्वासोछ्वास सारखे असावे Lol

प्रायश्चित्त <<< मलातरी वृत्तात वाचता येत आहे
प्रा + य+श्चित् + त
गा +ल+गा+ल

अनेक शेर आवडले

वैवकु, तुमचे ब्याकरण बिघडले आहे.

उर्दु शायरीसाठी अब्दालीकडे शिकवणी लावा. इकाराच्या आत दोन वर्ण आणि एक बाहेर वर्ण .... अआजवर ऐकलं नवतं असं

मराठीत लघु ला एक आणि गुरूला दोन इतकाच मामला असतो
उच्चार शिकावेत तर संस्कृताकडून म्हणजे उच्चारानुसार शब्दांची फोड कशी करायची ते कळते

>>लगोबाई हा उच्चार मी दाखवला तसाच करून पहायचा आहे मगच वृत्तात बसेल
ह्म्म्म वृत्तात बसेल हो, पण बर्‍याच गोष्टी त्यांच्या वृत्तीत नाहीत ना Sad
कोणता धागा कुठे नेऊन जोडतील नेम नाही हो Happy
बाकी येथे सर्वांची वृत्तावृत्ती चालू आहे ती चालू द्या !

<<<प्राय:श्चित्त.....२+२+२+१= ७ मात्रा
प्रायश्चित्त.......२+१+२+१= ६ मात्रा
..........प्रोफेसर >>>

माझ्या अल्पमति नुसार हा शब्द प्रायश्चित्त असा लिहिला जाते आणि त्याच्या २+२+२+२ = ८ मात्रा होतात. त्याचे कारण म्हणजे य वर जोर द्यावा लागतो, श्चि म्हणतानासुद्धा पुढच्या त्त मुळे जोर लागतो आणि दोन मात्रांशिवाय त्त चा उच्चार पूर्ण होत नाही.

ते 'य'वर जोर न देता प्रायश्चित्त म्हणू शकत असतील. असते एकेकाला एकेक कला अवगत. तुम्ही कोण विचारणारे म्हणते मी!

ते 'य'वर जोर न देता प्रायश्चित्त म्हणू शकत असतील<<< Lol

धन्य धन्य

बेफिकीर,

जरा दमान घ्या! गझल बद्दल ती योग्य असावी ह्या बद्दल वा ती पर्प्रकाशीत असल्याबद्दल आपलि मते असतील रादर आहेतच ती निदान देवपुर्करांच्या गझले वरून आवरती घ्यावित अशी विनंती. एखाद्याला टार्गेट करणे माबो वर नेहमीच होते त्यात नवीन काही नाही. तुम्ही स्वतः हे अनुभवले आहे. पण देवपुर्करांच्या बाबतीत तुम्ही व तुमचे सहृदय माबोवरील सामंजस्याची अलिखित रेघ ओलांडत आहात असे वाटले म्हणुन हे लिहीत आहे.

ह्यात त्यांची चुक नाही किंवा त्यंचे वर्तन योग्य अयोग्य ह्याच्यात मला पडायचे नाही. पण तुम्ही आवरते घ्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे.

पेशवा,

Happy

एक जुने माबो आय डी म्हणून तुमच्या विनंतीला मान देणे ह्यात मला कमीपणा वाटणार नाही.

तुमचा वरील प्रतिसाद काऊंटर करण्यास उपयुक्त असे तुमचे स्वतःचे (मला उद्देशून असलेले) काही अत्यंत हीन व वैयक्तीक प्रकारचे प्रतिसाद माझ्याकडे कॉपीपेस्टेड स्वरूपात आहेत. पण ते येथे वापरणे हे आंतरजालीय स्मार्टनेसव्यतिरिक्त काही नसेल हे मलाही पटत असल्याने येथे देत नाही, हा धागा वेगळा आहे ह्याची नम्र जाणीव आहे.

प्रोफेसरांनी 'स्पेसिफिकली' मायबोलीकर गझलकारांनी रचलेल्या गझलांच्या जमीनीवर मुद्दाम स्वतःच्या गझला रचून त्या प्रकाशित केल्या. गझलेच्या जमीनीवर जरी प्रताधिकार असू शकत नसला (आणि तसेही आजकाल सगळ्यांच्याच मते मराठी गझलकार हे निव्वळ निकृष्ट दर्जाचे यमककार असले) तरीही प्रोफेसरांचे हे कृत्य निव्वळ खोडसाळपणाचेच आहे ह्यात मला अजिबात शंका नाही. जी व्यक्ती स्वतः रोज एक गझल रचू / प्रकाशित करू शकते तिला सलग सात परकीय जमीनी वापरण्याची इच्छा होणे हे नैसर्गीक नाही. 'आणि' त्याचमुळे ह्या(ही)वेळी त्यांच्या गझलांवर टीका केली गेली व टीका करणार्‍यांमध्ये माझाही सहभाग होता. ह्याचे मला 'एक सहृदय माणूस' म्हणून वाईट वाटत नाही. मी स्वतः असे कधीही केलेले नाही. (एक अपवाद - संकेतस्थळ सुरेश भट - प्रदीप कुलकर्णींची गझल - मी असा तसा काही उन्मळायचो नाही - उद्देश निराळा).

गझलेची जमीन दुसर्‍याने वापरण्यात वाईट वाटण्यासारखे काही नसते पेशवा! आनंदच व्हायला हवा खरे तर! पण कोणी वापरली, कधी वापरली ह्या सगळ्यामागची पार्श्वभूमी जर ज्ञात असली तर वेदना होऊ शकतात. खरे तर तुमच्यापेक्षा जास्त हे कोण जाणणार की कवितेला वास्तव बनवण्याच्या वेदना किती असतात आणि तिची व्हर्जन्स करणार्‍यांबाबत मनात काय येते! कोणतीच गझल शंभर टक्के खरी नसते, पण 'माझे खरे सांगण्याच्या प्रयत्नात गझलतंत्रात बंदिस्त झाल्यामुळे अवघ्या संस्कृतीचे खरे सांगण्याची अगतिकता सोसावी लागणे' ही गझलेच्या पिंजर्‍यातील असहाय्य पक्ष्याची फडफड आणि तडफड आहे. ती अनुभवण्याच्या प्रयत्नात येथील स्वतंत्र पक्षी धन्यता मानत आहेत.

तुमच्या विनंतीस मान देऊन आणि मायबोलीवर गझलेला (आहेत किंवा नाहीत त्यापेक्षा) अधिक बरे दिवस यावेत ह्या उद्देशाने मी प्रोफेसरांच्या गझलेवर ह्यापुढे काही आवडले तरच प्रतिसाद देईन.

मात्र एक नोंदवतो - तुमच्या प्रतिसादात तुम्ही असे म्हंटलेले आहेत की कोण योग्य आणि कोण अयोग्य ह्याबाबत तुम्हाला काही म्हणायचे नाही, हे मुद्दलातच अयोग्य नाही का?

स्वाती आंबोळे - आपल्या अभिप्रायातील प्रामाणिक भावनेबद्दल मनापासून धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मुळात ज्या जमिनीत दम असेल तीच जमिन लिहायला घ्यावी असा मोह शायराला होऊ शकतो!
हा तर मूळ जमिनमालकाचा(?) सन्मान आहे असे मी समजतो!

ज्याची जमिन आहे तो सोडून इतरांचे कोरडे उमाळे लिहिणा-यांची मानसिकता दर्शवितात!

माझी कोणतीही जमिन कोणीही वापरावी! माझी काही हरकत नाही!
उलट जास्त सकस शेर असतील तर मी स्वत:हून ते शेर शायराच्या नावासकट पेश करेन व त्याला वंदन करेन!
आजवर चाललेल्या या फुटकळ चर्चेतून संपण्याची भीती व न्यूनगंडच मला दिसत आहे!

बेफिकीर, धन्यवाद ! माबोवर असा कुठलाही धुतला तांडुळ नाही ज्याने कंपुबाजी, हिन प्रतिसाद, वैयक्तिक प्रतिसाद असे केलेले नाही. मी अपवाद असण्याची एरविही शक्यता नाही ह्या बाबतीत तर अजिबात नाही. पण तरीही कधीतर अशा नॉट सो पर्फेक्ट आयडी मधुनच व्होइस ऑफ रिझन येतो. आज कधाचीत मी असेन उद्य तुम्ही असाल. सो तुम्ही माझ्या बोलण्याचा मतितार्थ लश्करात घेतलात ह्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद!

प्रोफेसरांचे हे कृत्य निव्वळ खोडसाळपणाचेच >>> कदाचीत खोडसाळपणाचे आहे मन्य पण त्या जमिनिवर केलेली गझल ओरिजिनल गझलेच्या तोडिस तोड नसली, पर्प्रकाशीत असली तरी काय बिघडते? एका अर्थाने हे ओरिजिनल गझलेच विडंबनच तर नाही का? माबो वर कवितांची विडंबने नवीन नाहीत. कवीची कोणतिही परवानगी न घेता ती झालेली आहेत. आणि कधी कधी ती विडंबने ओरिजिनल कवितेच्या तोडिस तोड झालेली आहेत. पण कवितेचे विडंबन झाले / केले म्हणुन विडंबन करणार्याच्या अगेन्सट सगळे कवी असे चित्रे मी पाहिलेले नाही. त्यामुळे ते खोडसाळ वागतात म्हणुन आम्ही तसे वागतो हे रिझनिंग पटत नाही (कलाकृती संदर्भात).

म्हणुनच मी म्हटले कोण चुक कोण बरोबर ह्या जज्मेंट मधे मला पडायचे नाही.

देवपुरकर,

आपला व माझा काहीच परिचय नाही (अगदी मी तुम्हाला कोणत्याही हिन प्रतिसादाने देखिल जोडलेले नाही) पण तुम्हि सुद्धा 'हिटींग बॅक' थांबवावे अशी विनंती. गझलेबाबत कदाचित तुम्ही व इथिल गझल्कार ह्यांच्या मतात न सांधणारे डिफर्न्स असु शकतात पण. ते सांधले जावेत असा अट्टाहास कशाला ठेवायचा? माबोवर भरपुर जागा आहे ज्यात तुमच्या गझला वाढू शकतील ... डोंट अंडरेस्टिमेट थे पोवर ओफ कोमन माबोकर Happy

Pages