नाठाळ लोक झाले, आणू इथे तुका!

Submitted by profspd on 26 May, 2014 - 03:21

नाठाळ लोक झाले, आणू इथे तुका!
पाहू तरी कशा मग करतात ते चुका!!

हा भरत कलियुगाचा आहे तरी कसा?
रामा, तुझ्याच देतो फेकून पादुका!

मुर्दाड गाव आहे, चैतन्य ना कुठे......
मी आटवीत बसलो का रक्त हे फुका?

ना ओल भावनांची त्यांच्या उरामधे.....
प्रत्येक शेर त्यांचा वाटे सुका सुका!

नाही पसंत मजला वाणी विटाळणे......
हे फार छान झाले मी राहिलो मुका!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना ओल भावनांची त्यांच्या उरामधे.....
प्रत्येक शेर त्यांचा वाटे सुका सुका!

....................

सरान्च्या सगळ्या शेरान्चे समर्पक वर्ण्न