घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या ह्रदयातली ..

Submitted by सुशांत खुरसाले on 26 May, 2014 - 03:11

घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या ह्रदयातली
ठरलो न मी त्यांच्यासवे धकधक तुझ्या ह्रदयातली

दिसतील ही अंधारली दुःखे तुलाही कैकदा
तू एकदा विझवून बघ झकपक तुझ्या ह्रदयातली

या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?

मी अर्ज केला एकदा,अव्हेरला तू कैकदा
पडताळणी भलतीच गं,जाचक तुझ्या ह्रदयातली

येथून मी माझ्या घरी वद परतुनी जाऊ कसा..
आहे तरी सृष्टी किती भेदक तुझ्या ह्रदयातली?

कृत्रीमतेला शिंपडोनी गझल जर श्रुंगारली
मग ओळ कैसी व्हायची सार्थक तुझ्या ह्रदयातली

--सुशांत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वैवकु ...

मकस वर टाकली होती काही दिवसांपूर्वी .

प्राध्यापक साहेब बहुधा ही जमीन ढापतील असे
वाटते<< बघुया ..:हाहा:

एक दोन ठिकाणी वृत्त बदलत आहे. 'गं' मध्ये आणि कृत्रिमतेला हय शब्दांमध्ये!

चेहर्‍याला असे लिहायला हवे आहे. किरकोळ टायपो!

अव्हेरले ह्या शब्दाचा उच्चार काही ठिकाणी अव्व्हेरले असा तर काही ठिकाणी अव्हेरले असा केला जातो.

या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?<<< शेर फार आवडला Happy

प्राध्यापक साहेब बहुधा ही जमीन ढापतील असे
वाटते<<< Lol

घोषीत झाली माणसे निवडक तुझ्या ह्रदयातली
ठरलो न मी त्यांच्यासवे धकधक तुझ्या ह्रदयातली

दिसतील ही अंधारली दुःखे तुलाही कैकदा
तू एकदा विझवून बघ झकपक तुझ्या ह्रदयातली

या निर्विकारी चेहर्याच्या आत लाखो दंगली
केव्हा जगा समजायची चकमक तुझ्या ह्रदयातली?

क्या बात है..........

सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार .:)

बेफिजी , 'गं' जनरली दिर्घ पकडतात ना ? म्हणजे तसं ऐकलं होतं. त्यामुळे तसं लिहिलं गेलं .
'कृत्रीमतेला' असा बदल करतो आहे .धन्यवाद .