तू नको वागूस माझ्यासारखा

Submitted by जयदीप. on 25 May, 2014 - 07:22

तू नको वागूस माझ्यासारखा
मी घराची वाट चुकल्यासारखा

तू हवा आहेस का त्यांना तिथे
वाहतो आहेस वार्‍यासारखा

देव ही करतोच आहे ना चुका
वागतो माणूस असल्यासारखा

तोडले आहेस कुठले कायदे
का असा पळतोस चोरासारखा

मोजले होतेस तू तारे किती
एक तारा आज नसल्यासारखा

तू नको देऊस आता कारणे
ने मला वा भेट आल्यासारखा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users