कळाले तिला हे मिठी मारल्यावर....

Submitted by profspd on 23 May, 2014 - 08:42

कळाले तिला हे मिठी मारल्यावर....
किती वळ उमटलेत या काळजावर!

खुणेने कुठे सांगता सर्व येते?
तुला सर्व सांगेन मी, भेटल्यावर!

किती प्रश्न आहेत दुनियेतले हे.....
कळेना लिहू मी कशावर कशावर!

असे काय माझ्यात आहे कळेना.....
गिरकतात रस्ते मला पाहिल्यावर!

दिसायास होतो जणू मी सुटावळ.....
खरे मोल माझे कळे मोजल्यावर!

उजेडा कळाली तुझी आज किंमत.....
सकाळी सकाळीच अंधारल्यावर!

नको औषधे कोणती वा मलमही.....
भरावी जखम ही प्रिये, फुंकल्यावर!

मला वेंधळ्यालाच कळली न चाहुल....
कशाला चिडू मी तुझ्या उंब-यावर?

तुला फक्त चाळून काही न कळले.....
उमजलीस मज तू, तुला वाचल्यावर!

कुणाचे तरी जाहल्यावर समजते.....
न माझे-तुझे आपले मानल्यावर!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही कळाले गझल घातल्यावर
दुखे हात सोर्‍या जरा दाबल्यावर

हे काय? आणखी एक गझल झाली इतक्यात? कमाल आहे खरंच! एक शेर रचता रचता नाकी नऊ येतात आमच्या! प्रोफेसर साहेब रोज एक गझल करतात नवी.

स्वाती अन्डरस्कोअर आंबोळे, तुम्ही इथे वर्षानुवर्षे अभिप्राय देताहात, एकदा एक शेर रचून दाखवा.

भरावी जखम ही प्रिये, फुंकल्यावर!<<

ह्या ओळीत अर्थ लावताना जाणवले की फुंकल्यावर म्हणजे कुणी फुंकल्यावर जखम बरी व्हायला हवी आहे कारण प्रिये हे केवळ संबोधनार्थ आले असल्यासारखे आणि शेराचा तोंडवळा पाहता तिचीच फुंकर पाहिजे आहे असे दिसते पण तू फुंक असे ही तिला म्हटले नाहीयेय तिला फक्त प्रिये अशी आर्त हाक मारून तिथेच सोडून दिले आहे असे वाटले

भरावी जखम ही तिने फुंकल्यावर >>>>> असे काहीसे करणे सयुक्तिक ठरेल का ??

पण तू फुंक असे ही तिला म्हटले नाहीयेय तिला फक्त प्रिये अशी आर्त हाक मारून तिथेच सोडून दिले आहे असे वाटले<<<

हे विधान हास्योत्पादक आहे.

कळाले तिला हे मिठी मारल्यावर...

तिला कळालं हे समजल. पण कुणी कुणाला
कविता, गझल समजतच नाही राव. डोक्याला शोट आहेत.
दुसर कोनी नाही लिहीत कविता ?

Happy

.

========================================
I Am Also A Poet But Not A Critic.

chakalee paadanyaache yantra <<< जवाब लॉक किया जाय !!!!!!............और ये बिल्कुल सही जवाब !!!!

मलाही कळाले गझल घातल्यावर
दुखे हात सोर्‍या जरा दाबल्यावर

Biggrin

विचारेन आता तुला भेट्ल्यावर
़किती हक्क माझा तुझ्या ़ काळजावर

-ममता सिंधुताई.

पहा मायबोलीकरांची अवस्था......
गझल कोणती चांगली वाचल्यावर!

...............प्राचार्य सतीश देवपूरकर

खुणेने कुठे सांगता सर्व येते?
तुला सर्व सांगेन मी, भेटल्यावर! >>>>>>>>

खुणेनी सांगता येतय म्हणजे समोरा समोर च असणार ना, मग भेटणे वेगळे काय असते ?

खुणेने सांगतो आहे म्हणजे इशा-याने सुचवतो आहे कारण इतर अनेक भोवतीच्या लोकांची उपस्थिती! म्हणून शायर म्हणतो आपण (एकांतात) भेटल्यावर सर्व यथार्थ सांगेन! इथे खुणेने सांगणे हा शब्दप्रयोग अनेक अव्यक्त गोष्टींचा निर्देश करतो! गझलेतील शेरात शायराला मिळणारे अवकाश फारच सीमीत असते म्हणून तो मोजक्या शब्दांतून, शब्दसंगतीतून अनेक गोष्टी सहृदयी रसिकांस सुचवीत असतो व अशा रितीने रसिकांच्या काळजात प्रवेश मिळवीत असतो व अभिव्यक्त होत असतो! समग्र शेराचे चिंतन केले की, अनेक अव्यक्त बाबींचा मनास उलगडा होतो असा माझा तरी अनुभव आहे!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
..................प्राचार्य सतीश देवपूरकर